bala nandgaonkar
bala nandgaonkar sarkarnama
पुणे

बाळ नांदगावकर म्हणाले... 'हम होंगे कामयाब'!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यातील वातावरण बदलत आहे. सोळावे वरिस धोक्याचे.... विरोधकांसाठी आणि मनसेसाठी मोक्याचे, असे सुचक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केले. ते पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सोळावा वर्धापनदिन आहे. मनसेचा पहिलाच वर्धापनदिन मुंबईबाहेर पुण्यात साजरा करण्यात येत आहे. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अमित ठाकरे (Amit Thackeray) , नितीन सरदेसाई, शर्मिला ठाकरे, यांच्यासह मनसेचे राज्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित आहेत.

या वेळी नांदगावकर यांनी, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब हे गाणे गात उपस्थित मनसे कार्यकर्त्यांचा उत्सह वाढवला. तसेच आता निवडणुका लढवायच्या नाहीत तर जिंकायच्याच आहेत, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या काळामुळे दोन वर्ष मेळावा झाला नाही. कोरोना काळताही आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. ही काही चालेली मचमचगीरी आहे, त्यापासून आपण फार दुरु आहोत, असा टोलाही त्यांनी इतर पक्षांना लगावला.

नांदगावकर म्हणाले, लोक विचारतात तुमच्याकडे आमदार, खासदार नाहीत. मी सांगतो, की आमदार, खासदार नसले तरी आमच्याकडे निर्माता आहे. याच गर्दीतून उद्या ते तयार होणार आहेत, असेही नांदगावकर यांनी सांगितले. मनसेच्या वर्धापन दिनाला पुण्यामध्ये मोठी गर्दी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT