MLA Rohit Pawar  Sarkarnama
पुणे

MLA Rohit Pawar : 'वादा तोच..! पण दादा नवा...!'; रोहित पवारांच्या बॅनर्सची चर्चा

Rohit Pawar Banner : खासदार शरद पवार यांची उद्या मंचर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी रोहित पवारांच्या बॅनर्सची मोठी चर्चा रंगली आहे.

Ganesh Thombare

Pune Political News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश आहे. आता वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची बुधवारी (21 फेब्रुवारी) जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बॅनर्सची मोठी चर्चा रंगली आहे.

'वादा तोच..! पण... दादा नवा...!', अशा आशयाचे रोहित पवारांचे बॅनर्स पुणे-नाशिक महामार्गावर झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुण्याचा 'दादा' कोण ? अशी चर्चा या बॅनर्सवरून रंगली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादांची जागा रोहित पवार घेत आहेत का ?, असा सवालदेखील या निमित्ताने अनेकजण उपस्थित करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाताे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अजित पवार हेच 'दादा' आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पुण्याची अजितदादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याची बॅनरबाजी मंचर-कळंब या परिसरात करण्यात आली आहे. या बॅनर्सवर "वादा तोच..! पण दादा नवा", अशी टॅगलाइन देण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

खासदार शरद पवार यांची उद्या मंचर येथे जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेसाठी 'मी येतोय...' असा संदेश दिला जात आहे, तर तर दुसरीकडे 'वादा तोच..! पण दादा नवा..!',अशा टॅगलाइनचे बॅनर्स झळकल्यामुळे पुण्याच्या राजकारणात या बॅनर्सची मोठी चर्चा सुरू आहे.

वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मंचरला बुधवारी शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. आंबेगाव, शिरूर विधानसभा मतदारसंघ हा वळसे पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवारांची सभा होत असून, ते या सभेत नेमकं काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT