Supriya Sule News : अजित पवारांना मिळालेल्या 'घड्याळा'बाबत खासदार सुळेंचे मोठे विधान; म्हणाल्या...

Thanks to the Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे मानले आभार
Supriya Sule - Ajit Pawar
Supriya Sule - Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाला आठवड्यात चिन्ह देण्याबरोबरच पुढील आदेश येईपर्यंत पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष कायम ठेवण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत. आम्हाला चिन्ह मिळू नये, यासाठी विरोधी गटाच्या वकिलांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, कोर्टाने त्यांना फटकारत न्याय दिला असल्याची भावना सुळे यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule - Ajit Pawar
Amol Kolhe: दोन पवारांमध्ये लढत असल्याने शिरूरची निवडणूक माझ्यासाठी कुरुक्षेत्रातील युद्धासारखीच!

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहे, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मूळ पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निर्णय देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. याविरोधात शरद पवारांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर सोमवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला आठवड्यात शरद पवारांच्या पक्षाला चिन्ह देण्याचे आदेश दिले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष कायम ठेवावा,असे निर्देश दिले आहेत.

कोर्टाने दिलेल्या निकालावर खासदार सुळे यांनी आनंद व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, शरद पवार यांना पक्ष चिन्ह द्यायचं नाही, असा युक्तिवाद अजित पवार यांच्या वकिलाने केला. यावर वकील दहा ते पंधरा मिनिटं वाद घालत होते. यामध्ये हस्तक्षेप करत कोर्टाने सांगितले अस होऊ शकत नाही. शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं पाहिजे. कोर्टाने म्हटलं चुकीचा हट्ट धरू नये. शरद पवार यांना काहीच द्यायचे नाही, असं कसं म्हणू शकतात. अजित पवार यांना दिलेलं पक्ष चिन्ह हे फायनल नाही, असेही सुळे म्हणाल्या. आम्हाला चिन्ह मिळू नये, यासाठी अजित पवार यांचे वकील दडपशाही करत होते. मात्र, कोर्टाने आम्हाला न्याय दिला आहे.

Supriya Sule - Ajit Pawar
NCP News : शरद पवारांच्या आमदाराने घेतली अजितदादांच्या मोठ्या नेत्याची भेट; काय आहे कारण..?

ज्या व्यक्तीने पक्ष स्थापन केला, त्याच्याकडूनच पक्ष काढून घेतला जातो, हे मोठे दुर्दैव आहे. तुमचे मतभेद होते तर तुम्ही वेगळी चूल मांडायची होती. स्वतःच्या बळावर नवीन चिन्ह घेत मतदारांना सामोरे जायचे होते. मात्र, त्यांना सगळं आयते पाहिजे होते ना, आज महाराष्ट्रात घडत असलेल्या चुकीच्या प्रकारांमुळे आपली तुलना इतर राज्यांशी होत आहे, ही मोठी खेदाची बाब आहे. आदर्श घोटाळा हा देशात सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने केला. त्यात चव्हाणांना पक्षात प्रवेश देऊन राज्यसभेची उमेदवारी दिली. चव्हाण कुटुंबीयांची जाहीर माफी भाजपने मागितली पाहिजे, अशी मागणीही सुळे यांनी केली.

सेल्फीवरून अजित पवारांना टोला

संसदरत्न पुरस्कार आणि सेल्फी काढून कामे होत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली होती. याला खासदार सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आजच एक सेल्फी ऑर्डर आल्याचे वाचण्यात आलं, आज अनेक ठिकाणी सेल्फी काढावा असा आग्रह मोदी साहेब यांचा आहे. शाळेत सेल्फी काढा असा अध्यादेश काढण्यात आला आहे. सेल्फी काढण्यावर टीका करणाऱ्यांना हा जीआर चपराक असल्याचे सुळे म्हणाल्या.

Supriya Sule - Ajit Pawar
Manoj Jaranage: जो मराठा समाजाच्या बाजूने बोलणार नाही, तो विरोधक समजला जाईल; जरांगे पाटलांनी दिला इशारा

घरातील व्यक्ती विरोधात लढली तर हरकत काय?

बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे येत आहे. अजित पवार यांनीदेखील याबाबतचे संकेत दिलेले आहे. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणीही व्यक्ती कोठूनही लढू शकतो. फक्त समोर लढणारा विरोधक हा दिलदार असला पाहिजे, असे खासदार सुळे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे, जर घरातील व्यक्तीच माझ्याविरुद्ध लढली तर काय हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

R

Supriya Sule - Ajit Pawar
Jayant Patil News : जयंतरावांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सुळे म्हणाल्या, ‘दोनशे आमदार, तरीही आमचीच लोकं...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com