Baramati Agro  Sarkarnama
पुणे

Baramati Agro News: ...अन्यथा सात दिवसांत 'बारामती ॲग्रो' कारखाना बंद करणार! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं बजावली नोटीस

Baramati Agro pollution case : इंदापूर तालुक्यातील'बारामती ॲग्रो लिमिटेड' कारखान्याला 7 दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिले आहेत. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी 3 जुलै रोजी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

Deepak Kulkarni

Indapur News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून इंदापूर तालुक्यातील शेळफळगडे येथील 'बारामती ॲग्रो लिमिटेड' (साखर आणि डिस्टिलरी युनिट) ला 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. यावेळी प्रदुषण मंडळानं 'बारामती ॲग्रो'कडून पर्यावरण नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

इंदापूर तालुक्यातील'बारामती ॲग्रो लिमिटेड' कारखान्याला 7 दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिले आहेत. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी 3 जुलै रोजी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

आता यानंतर बारामती ॲग्रो लिमिटेड' कारखान्याकडून या आदेशावर 7 दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना थेट बंद करण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा महामंडळाने दिला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण महामंडळानं केलेल्या या पाहणीत कारखान्याकडून 2 एकरच्या कच्च्या तलावात प्रक्रिया न केलेले काळपट रासायनिक पाणी साठवणे, ते पाईपलाईनद्वारे थेट शेतीच्या कालव्यात सोडणे, खराब HDPE लायनिंग आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची असुरक्षित साठवणूक अशा 5 गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही यापूर्वीही बारामती अ‍ॅग्रो कंपनीतील दोन प्लांट बंद करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. यावर सुनावणी करताना बारामती अ‍ॅग्रोवर कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण मंडळाला दिला होता.

बारामती अ‍ॅग्रोवरील ही कारवाई सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे मंडळाकडून रात्री 2 वाजता ही नोटीस बजावली होती. या नोटीसद्वारे कारखान्यातील दोन युनिट्स 72 तासांत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या कारवाईनंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं होतं. तसेच ही कारवाई राजकीय सुडापोटी आणि तत्कालीन महायुती सरकारविरोधात लढत असल्यामुळे केली जात असल्याचा आरोपही करण्यात आले होते. तसेच अशा कारवायांच्या माध्यमातून दबावतंत्र वापरले जात असल्याचा गंभीर टीकाही करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT