Tamilnadu Politics: तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट: CM विजय यांना मोठा धक्का; मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

CM Vijay News: तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास घडवल्यानंतर मुख्यमंत्री व टीव्हीकेचे प्रमुख नेते थलपती विजय यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, निकालानंतर मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि त्यांचे मंत्री आधव अर्जुन यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
Vijay Tamil Nadu
Vijay is expected to meet Governor Rajendra Arlekar to stake claim for government formation in Tamil Nadu after reported backing from CPI, CPI(M) and VCK. (AI Image)Tamil Nadu
Published on
Updated on

Tamil Nadu News: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात थलपती विजय यांच्या नेतृत्वातील तमिळनागा वेत्री कळघम पक्षाने मोठी ऐतिहासिक विजय मिळवत डीएमके आणि एआयएडीएमकेची 50 वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. टीव्हीकेने 108 जागा जिंकून काँग्रेससह सरकार स्थान केले असून ते स्वतः विजय राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. याचदरम्यान, त्यांचीच आमदारकी अडचणीत आली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास घडवल्यानंतर मुख्यमंत्री व टीव्हीकेचे प्रमुख नेते थलपती विजय यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, निकालानंतर मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि त्यांचे मंत्री आधव अर्जुन यांची आमदारकी धोक्यात आली आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने थलपती विजय आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्याला 2026 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकांप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

विजय यांच्या निवडीविरोधात पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट तर विल्लीवक्कम मतदारसंघातून आधव अर्जुन यांच्या विजयाविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर नुकतीच सुनावणी पार पडली.त्यावेळी हा न्यायालयाकडून हा आदेश देण्यात आला.

Vijay Tamil Nadu
Pune Metro: कोट्यवधींचा खर्च अन् पहिल्याच पावसात 'पाण्यात'? पुणे मेट्रोच्या 'छत्रपती संभाजी महाराज' अन् 'स्वारगेट' स्थानकात साचलं पाणी...

धक्कादायक बाब म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि टीव्हीकेचे ज्येष्ठ नेते मंत्री आधव अर्जुन यांच्याविरोधात एकूण सहा निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात चार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. यापैकी तीन याचिका पेरंबूर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या आहेत. या याचिका एस. दिनेश, आर. डी. शेखर (आणि टी. एन. लक्ष्मी नरसिंहन यांनी दाखल केल्या आहेत.

तर तिरुचिरापल्ली ईस्ट मतदारसंघातील विजयाविरोधात एस. इनिगो इररुदयराज यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. तर मंत्री आधव अर्जुन यांच्याविरोधात विल्लीवक्कम विधानसभा मतदारसंघातील विजयाविरोधात आर शिवराज आणि कार्तिक मोहन यांनी याचिका दाखल केल्या आहेत.

Vijay Tamil Nadu
NCP with NDA: शरद पवारांचा पक्षही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा! अधिवेशन सुरु असतानाच मुख्यमंत्री अचानक दिल्लीला होणार रवाना; नेमकं काय सुरुए?

टीव्हीकेने 108 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले आणि स्वतः विजय राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेततामिळनाडूमध्ये 4 मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला अन् इतिहास घडला. कारण अभिनेता आणि आता राजकारणी बनलेल्या थलापती विजय याच्या टीव्हीके नावाच्या पक्षानं इथं सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत सत्ताच स्थापन केली.

पण आता याच पक्षाची भुरळ इथल्या प्रमुख विरोधपक्षांनाही पडली आहे, कारण प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या AIADMK च्या तीन आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत थेट टीव्हीकेत प्रवेश केला आहे. यामुळं टीव्हीकेचं वजन वाढलं असून या पक्षाची इथं चांगलीच हवा असल्याचं सिद्ध झाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com