Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Politics: बारामतीत किती लीड? अजितदादा म्हणाले, "शंभर टक्के सांगतो..."

Ajit Pawar vs Yugendra Pawar Baramati Assembly election 2024: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "मला नाही माहिती...माझा मागचा अनुभव वेगळा आहे. म्हणून मी काय सांगत नाही," अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Sudesh Mitkar

Pune News: यंदा बारामती विधानसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादी पक्ष आमने-सामने आहेत. राष्ट्रवादीकडून अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात आहेत. आतापर्यंत अजित पवार बारामतीमधून रेकॉर्ड मतांनी निवडून येत राहिले आहेत. त्यामुळे यंदा निवडणुकीत अजितदादांना किती मत मिळणार याबाबत उत्सुकता असताना खुद्द अजित पवारांनीच आपल्या लीडबाबत दावा केला आहे.

सिंचन घोटाळा बाबतची गोपनीय फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना कशी दाखवली असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले,"सिंचन घोटाळा माहिती अधिकारात पाहिजे ती माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. एखाद्याने चुकीचे सांगितलं तर तुम्ही दुरुस्त करून घ्यायला पाहिजे,"

लाडकी बहिणीसह इतर विविध योजनांच्या घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आल्या आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, "काही राजकीय लोक बनवाबनवी करायला लागले आहेत. महाराष्ट्रातील मतदारांना फसवायला लागले आहेत. आमच्या सरकारने ज्यावेळेस दीड हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आमच्यावर टीका झाली.

दादां खोटं आश्वासन देतात अशी टीका त्यांनी केली. जे आमच्या योजनेवरच टीका करत होते. ते पण आता तीन हजार रुपये,चार हजार रुपये देऊ असे आश्वासन देत आहेत. या सोबतच इतरही गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र याचं गणित केल्यास पूर्ण बजेट यातच संपेल . महाविकास आघाडीने सात लाख बजेट पैकी पाच लाख आता आश्वासनात संपवले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री 2100 रुपये देणार म्हटले याबाबत त्यांनी माझ्यापेक्षा वेगळा विचार केला असेल, बाकीचे पैसे केंद्राकडून मागू असे त्यांना वाटलं असेल की त्यांना विचारून सांगतो,"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीत होणार का याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,बारामतीत मला कोणाची सभा नको त्यापेक्षा इतर भागांमध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. वरिष्ठांच्या सभा इतर ठिकाणी होतील.

बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा किती लीड मिळणार असं विचारलं असता "आता मी प्रचारासाठी फिरतोय, बारामती संपूर्ण फिरून झाल्यावर लीड सांगेन...पण एवढे शंभर टक्के सांगतो की चांगलं लीड असेल, मतदारांशी हितगुज करून रेकॉर्ड तोडेल की नाही ते सांगतो," असं अजित पवार म्हणाले.

शरद पवारांच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "मला नाही माहिती...माझा मागचा अनुभव वेगळा आहे. म्हणून मी काय सांगत नाही," अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT