Dattatray Bharane with Laxman Hake during a key meeting ahead of the Baramati by-election, influencing the candidate withdrawal decision. Sarkarnama
पुणे

Baramati By-Election 2026 : भल्याभल्यांना जमलं नाही ते दत्तामामांनी करून दाखवलं, एका भेटीतच लक्ष्मण हाकेंना निवडणुकीचं मैदान सोडायला लावलं...

Baramati by-election 2026, Laxman Hake withdrawal : पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही वेळ उरला असतानाच लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हाकेंनी निवडणुकीतून माघार घेण्यास राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांची भेट कारणीभूत ठरली आहे.

Jagdish Patil

Pune News, 06 Apr : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील नेत्यांनी अनेक प्रयत्न केले.

मात्र, तरीही या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं.

शिवाय या निवडणुकीमध्ये आपल्याला चार राष्ट्रीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा देखील त्यांनी सांगितलं होतं. काल रविवारी (ता.०५) हाके यांनी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून ओबीसी आंदोलक आहे आणि आंदोलक म्हणूनच मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. माझ्या ओबीसी बांधवांचे अनेक प्रश्न अजंड्यावर आणण्यासाठी ही निवडणूक लढत आहे, असं म्हणत त्यांनी निवडणूक लढवणारच असा निर्धार व्यक्त केला.

मात्र, आज अर्ज भरण्यासाठी काही वेळ उरला असतानाच त्यांनी निवडणुकीतून माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हाकेंनी निवडणुकीतून माघार घेण्यास राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांची भेट कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे अखेर दत्तामामांची शिष्टाई यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

एकीकडे आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्या असताना इकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली आणि त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर दत्तात्रय भरणे आणि लक्ष्मण हाकेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांससोर लक्ष्मण हाकेंनी आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं.

यावेळी दत्तात्रय भरणे यांनी बोलताना हाकेंना आपण विनंती केल्याचं सांगितलं. भरणे म्हणाले, "अजितदादांच्या निधनामुळे या परिसरात आणि राज्यात पोकळी निर्माण झाली. एक काम करणारा नेता, सर्वांना नेहमीच उपलब्ध होणारा आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा नेता आपल्यामध्ये राहिला नाही. अशात ही पोट निवडणूक सुनेत्रावहिनी लढत आहेत. सुनेत्रावहिनी बिनविरोध व्हाव्यात आणि यासाठी हाके सरांनी सहकार्य करावं त्यांना पाठींबा द्यावा अशी विनंती करण्यासाठी मी सुनेत्रावहिनींच्यावतीने आलो आहे."

शिवाय मी सगळ्यांशी चर्चा केली आणि हाके सरांना बारामती निवडणुकीतून माघार घेणं का गरजेचं आहे हे सांगितलं. आणि त्यांनी चांगल्या विचाराबरोबर आणि मी नेहमी चांगल्या गोष्टीला पाठिंबा देतो असं हाके सरांनी मला सांगितलं, असंही भरणे यावेळी म्हणाले. शिवाय त्यांनी यावेळी सर्वच उमेदवारांना अजितदादांना श्रद्धांजली वाहायची असेल तर बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी माघार घ्यावी, असं आवाहन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT