Uddhav Thackeray Politics : सुनेत्रावहिनींना उद्धव ठाकरेंचा पाठींबा नाही? भूमिका गुलदस्त्यात; फडणवीसांवर फोडले खापर!

Uddhav Thackeray Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी पाठींब्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मात्र, ठाकरेंनी आपली भूमिका अजुनही जाहीर केली नाही.
Uddhav Thackeray Sunetra Pawar
Uddhav Thackeray Sunetra Pawar sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी पाठींब्यासाठी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मात्र,त्यांची भूमिका नेमकी काय आहे? हे समोर आले नव्हते. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केले.

ते म्हणाले, 'या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नाही. काँग्रेसने निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे. आता अर्ज भरणार, त्यानंतर अर्जाची छाननी होणार आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यात येणार. या सर्व प्रक्रियेनंतर दहा दिवस प्रचार चालणार. तेव्हा पाठींबा द्यायचा की नाही याचा प्रश्न येतो. पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसची एक भूमिका आहे. निवडणूक बिनविरोध होऊ द्यायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे.'

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा सुनेत्रा पवारांना पाठींबा आहे की नाही हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. ठाकरेंच्या भूमिका अजुनही गुलदस्त्यात असल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात पोटनिवडणुका बिनविरोध होत होत्या. मात्र, हा बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडून काढल्याचा आरोप देखील राऊतांनी केला.

संजय राऊत म्हणाले, नांदेडला काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. तेव्हा आम्ही विनंती केली बिनविरोध होऊन जाऊ द्या. त्यांचे पुत्र निवडणुकीच्या मैदानात होते मात्र तेव्हा फडणवीसांच्या पक्षाने उमदेवार दिला. प्रचारासाठी दिल्लीतून अमित शाह आले.

Uddhav Thackeray Sunetra Pawar
Baramati By-Election : सुनेत्रा पवारांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेऊ पण..., काँग्रेस उमेदवाराने घातली अट; फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष

पंढरपूरमध्ये भालके नानांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात होत्या. तेव्हा देखील आम्ही निवडणूक बिनविरोध होऊद्या अशी विनंती केली होती. मात्र, त्यांनी तेव्हा देखील उमेदवार दिला. जेव्हा त्यांची गैरसोय, सोय असते तेव्हा त्यांनी उमेदवार दिला आहे. निवडणूक बिनविरोध केली नाही.

अजित पवार हे जेव्हा त्यांच्या विरोधात होते. तेव्हा त्यांनी देखील चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात असताना त्यांच्या विरोधात नाना काटेंना उमेदवारी दिली होती. काटेंनी 99 हजार मतं घेतली होती. ज्यांना सरकार विरोधात राग काढायचा असेल तर त्यांच्यासाठी निवडणूक हे एक माध्यम होते, असे देखील राऊत म्हणाले.

फडणवीस असंवेदनशील...

विरोधी पक्षातील असले तरी एकमेकांची नाती जपली होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि देशात नरेंद्र मोदी अमित शाह यांची सरकार आली तेव्हापासून महाराष्ट्राची संवेदना मारली गेली. आताही आम्ही एकमेकांशी बोलत असतो.त्यामुळे मागे ईडी लावतील की काय? असे वाटते, असे देखील राऊत यांनी सांगितले.

Uddhav Thackeray Sunetra Pawar
Baramati By Election : सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन पण जय पवारांचा वेगळाच प्लॅन, बारामतीच्या राजकारणात ट्विस्ट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com