Laxman Hake Withdraws : अर्ज भरण्यासाठी काही वेळ उरला असतानाच लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांची...

Baramati By-Election 2026 : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बारामती विधानसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर आता ऐन उमेदवारी अर्ज भरण्याला काही वेळ उरला असतानाच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Laxman Hake, Sunetra Pawar
Laxman Hake, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 06 Apr : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. मात्र, अर्ज भरण्यासाठी काहीवेळ उरला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण होके यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील नेत्यांनी खूप प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी काँग्रेस आणि हाके यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, तरीही काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली.

शिवाय दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर आता ऐन उमेदवारी अर्ज भरण्याला काही वेळ उरला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली आणि त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली.

त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर लक्ष्मण हाकेंनी आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विनंती केल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठांनी विनंती केल्यानंतर आपण ही माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं.

Laxman Hake, Sunetra Pawar
Sharad Pawar oath ceremony : शरद पवार आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार तर, पार्थ पवार 'या' तारखेला...

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मी माझी भूमिका सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट आहे. परंतू काही प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. मात्र, मला राज्यातील वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आले. त्यामध्ये सुनेत्राताई, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी मला रिक्वेस्ट केली त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.

पण मी माझी लढाई संघर्ष सुरूच ठेवणार आहे. इथून पुढेही मी प्रश्न मांडत राहणार आहे. आमच्या अनेक मागण्या मान्य होत नाहीत. अनेक महामंडळांना अध्यक्ष भेटलेला नाही. आम्हाला अशा काही गोष्टी जाणवल्यामुळे मी आक्रमक भूमिका घेतली.

मात्र, त्यानंतर मला जेव्हा सर्वांचे फोन आले आणि खासकरून सुनेत्राताईंचा फोन आला तेव्हा मी हा निर्णय घेतला." शिवाय यावेळी त्यांना तुमच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित होणार नाही का? असा सवाल केला असता, ते म्हणाले "कर नाही तर डर कशाला? मी निवडणूक झाल्यावर देखील थांबणार नाही. मी माझे प्रश्न या सर्वांकडे अशाच पद्धतीने पुढे मांडत राहणार."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com