Sunetra Pawar Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar : "मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून...", उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी केला शरद पवारांचा उल्लेख

Baramati By-Election 2026 : "दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीची पोटनिवडणुक होईल. दादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला. बारामतीकरांकडे बघूनच मला धीर आला."

Jagdish Patil

Baramati By-Election 2026 : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अर्ज भरण्यापूर्वी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यासह जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडेंसह अनेक नेते उपस्थित होते. मेळाव्यात भाषण करताना सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीची पोटनिवडणुक होईल. दादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला. बारामतीकरांकडे बघूनच मला धीर आला."

त्या म्हणाल्या, इथल्या वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रम मोडून काढलेत. पण ही निवडणूक नाही तर अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती, असं म्हणत बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिलं.

शिवाय यावेळी त्यांनी बारामतीकरांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. ही निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही जास्त साथ मला द्याल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, त्यांनी मी अजितदादांचा विचाराचा वारसा सांभाळात काम करेन असा शब्द दिला. तर 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असं वक्तव्य देखील सुनेत्रा पवार यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT