Baramati By-Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी अजुनही दोन तासांचा कालावधी राहिली आहे. तब्बल 53 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यातील 17 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अजुनही निवडणुकीच्या मैदानात 36 जण आहेत. त्यामुळे काँग्रेसने माघार घेतली तरी अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसकडून आकाश मोरे हे उमेदवार आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी शरद पवारांशी संवाद साधताना त्यांचा उमेदवार माघार घेईल, असे सांगितले आहे.
त्यामुळे मोरे हे माघार घेणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, अपक्ष उमेदवार आपला अर्ज मागे घेणार की नाही हे स्पष्ट झाले नाही. काँग्रेस जर निवडणुकीच्या मैदानात नसेल तर ही निवडणूक केवळ औपचारिकता असेल. दरम्यान, 36 अपक्ष उमेदवारांपैकी तीन वाजेपर्यंत कोणकोण माघार घेणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
करुणा धनंजय मुंडे या देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 10 कोटीहून अधिक असल्याचे सांगितले आहेत. तसेच अभिजित बिचकुले हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले आहेत. त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती सपकाळ यांना केली. मकरंदआबा पाटील म्हणाले, आमच्या विनंतीला हर्षवर्धन सपकाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सपकाळ सकारात्मक प्रतिसाद देतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.