Rohit Pawar News : बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यामुळे कोणकोण या निवडणुकीत माघार घेणार हे आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काल सुनेत्रा पवारांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली.
रोहित पवार यांनी सपकाळांची भेट घेतल्यानंतर त्यांना बारामतीमधील निवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णय काय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अनेक राजकीय पक्षांची इच्छा आहे. आमच्या पक्षाने सर्वप्रथम आम्ही उमेदवार देणार नाही, असे जाहीर केले. होते. काँग्रेसने लढण्याचा निर्णय घेतला आहे. मी सपकाळसाहेबांना भेटून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे. त्यांनी उमेदवारी भरत असताना अजितदादांना जो न्याय मिळाला पाहिजे होता तपासाच्या बाबातीत, एफआयआरच्या बाबतीत तो आज या महाराष्ट्रात दिला जात नाही हा महत्वाचा संदेश दिला आहे.
काही दिवसांपूर्वी पार्थकडून हे वक्तव्य करण्यात आले होते. त्याबाबत काँग्रेसमध्ये नक्कीच नाराजी आहे. ते चुकीचे स्टेटमेंट पार्थच होतं तरीसुद्धा पार्थच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त त्यांच्याकडे केली, असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार म्हणाले, ते (हर्षवर्धन सपकाळ) सुद्धा वरिष्ठांशी बोलतील. फाॅर्म मागे घेण्याच्या वेळेच्या आधी ते योग्य निर्णय घेतील. शेवटी काँग्रेस निर्णय घेत असताना त्यांची धोरणं, तो पक्ष वेगळा आहे. त्यांची प्रोसेस वेगळी आहे. त्याप्रमाणे ते जातील, असे वाटत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.