Baramati By-Election : शरद पवारांनी पडद्यामागून सुत्र फिरवलं अन् बारामतीमधून काँग्रेसने माघार घेतली, इनसाईड स्टोरी समोर!

Sharad Pawar Congress : बारामतीमधून काँग्रेस माघार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी शरद पवारांनी पडद्यामागून सुत्र फिरवली आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : बारामती पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम होती, मात्र, आज अचनाक राज्यातील नेत्यांनी आम्ही माघार घेणार असल्याचे जाहीर केले. आमचा निर्णय पक्षश्रेष्ठींना सांगणार असून त्यानुसार निर्णय घेऊ असे विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, काँग्रेस माघार घ्यावी म्हणून शरद पवार मैदानात उतरले होते.

ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला काँग्रेसला देईल, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. त्यामुळे शरद पवार ही निवडणुकीत बिनविरोध करण्यासाठी मैदानात असल्याचे स्पष्ट झाले होते. काँग्रेसचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात त्यामुळे त्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी संपर्क साधला.

खर्गे यांना फोन करत पवारांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी खर्गेंनी काँग्रेस माघार घेईल, असे आश्वासन शरद पवारांना दिले. तसेच राज्यातील नेत्यांनी देखील दिल्लीतील वरिष्ठांना लोकभावनेचा आदर करत ही निवडणूक न लढण्याचे कळवले आहे.

Sharad Pawar
Baramati By-Election : बारामतीमधून काँग्रेस माघार घेणार? रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट

अधिकृत घोषणा नाही...

बारामती निवडणुकीतून माघार घेत असल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर लगेच माघार घेतली जाणार असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राजेश विटेकर, मकरंद आबा पाटील, सना मलिक आदी नेते हर्षवर्धन सपकाळ यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत

Sharad Pawar
Baramati By-Election : मोठी बातमी! बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, 'आमच्या वरिष्ठांशी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com