NCP leaders and party workers during celebrations after Baramati Municipal Council election results, amid muted reactions due to internal setbacks. Sarkarnama
पुणे

Baramati Election: बारामतीत राष्ट्रवादीकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग; नेमका काय झाला फायदा?

Baramati Election: निवडणुकीतील भाषणादरम्यानच अजित पवार यांनी ज्या समाजास प्रतिनिधीत्व मिळालेले नाही, अशांना स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व देण्याचा शब्द दिला होता.

मिलिंद संगई :सरकारनामा

बारामती : येथील नगरपरिषदेच्या चार स्वीकृत नगरसेवकांच्या जागेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बारामती नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राहुल वाघोलीकर, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे व अमोल कावळे या चार जणांना संधी देण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.

बारामती नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. सहा जागा विरोधात निवडून आल्या असल्या तरी राष्ट्रवादीचा गट स्थापन करताना सहा पैकी तीन जणांनी पक्षाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढली आहे.

निवडणुकीतील भाषणादरम्यानच अजित पवार यांनी ज्या समाजास प्रतिनिधीत्व मिळालेले नाही, अशांना स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व देण्याचा शब्द दिला होता. त्या नुसारच या चार जणांना संधी देण्यात आली आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. पुढील चार वर्षात आणखी काही उपेक्षित समाजघटकातील प्रतिनिधींना बारामती नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून सामावून घेतले जाणार असल्याचे संकेत पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 16) अधिकृतपणे नगरपरिषदेच्या सभेत या चारही नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. उपनगराध्यक्षपदीही कोणाला संधी दिली जाते या कडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT