Ladki Bahin Yojana: जानेवारीचा हप्ता देण्याचा सरकारचा निर्धार! 'या' दिवशी खात्यात जमा होणार पैसे; निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली?

Ladki Bahin Yojana: पण तरीही हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यावर सरकार ठाम असून हा हप्ता कधी देणार याची तारीखही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केली आली आहे.
 Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी उद्या (१५ जानेवारी) मतदान पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला. पण जानेवारीचा हप्ता मतदानापूर्वी देता येणार नाही, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला होता. पण तरीही हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यावर सरकार ठाम असून हा हप्ता कधी देणार याची तारीखही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केली आली आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या आदेशाला सरकार केराची टोपली दाखवणार असल्याचे संकेत आहेत.

 Ladki Bahin Yojana
Nagpur Crime: भयानक! वेगळ्या राहणाऱ्या पत्नीने मागितला मुलीचा ताबा; चिडलेल्या पित्याकडून त्याच चिमुकलीचा केला खून

मकरसंक्रांतीपूर्वीच डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे एकूण ३००० रुपये लाडक्या बहिणींच्या खत्यात जमा होतील, असं यापूर्वी वारंवार महायुती सरकारच्या विविध मंत्र्यांकडून सांगण्यात येत होतं. पण मकरसंक्रांत ही मतदानाच्या आदल्या दिवशीच येत असल्यानं जर दोन महिन्यांची एकत्रित रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. मतदानाच्यापूर्वीच अशा प्रकारे थेट रोख रक्कम पाठवल्यानं त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप काँग्रेस घेत निवडणूक आयोगात तक्रार केली होती.

 Ladki Bahin Yojana
BJP Politics: भाजपकडून वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीची जामखेडच्या स्वीकृत नगरसेवकपदी नेमणूक! तुषार आपटे प्रकरणाची पुनरावृत्ती का?

काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेत यावर निवडणूक आयोगानं आपली भूमिकाही स्पष्ट केली. राज्य सरकारला आयोगानं आदेश दिले की, एकाच वेळी दोन महिन्यांचे पैसे देणं नियमबाह्य ठरू शकतं. याचाच अर्थ जर सरकारनं एकाच वेळी दोन महिन्यांचा हप्ता दिला तर तो आचारसंहितेचा भंग ठरू शकतो. आयोगाच्या या सूचनेची दखल घेत राज्य शासनानं नाईलाजानं केवळ डिसेंबर महिन्याचा हप्ताच जो १५०० रुपये आहे हा द्यावा लागला. हा हप्ता १२-१३ जानेवारीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला. त्यामुळं सुरुवातीला दोन महिन्यांचे ३००० हजार येणार अशी अपेक्षा असल्यानं प्रत्यक्षात १५०० रुपयेच आल्यानं महिला वर्ग नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ताज्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं की, याच जानेवारी महिन्यातच याच महिन्याचा हप्ता आम्ही देणार आहोत. भारत एक्स्प्रेस नावाच्या एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, "विरोधकांची वृत्तीच अशी आहे की, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा विरोधक हायकोर्टात गेले की ही योजना सुरु करु नका. आम्ही हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जिंकलो. आत्ताही त्यांनी अशाच प्रकारची तक्रार केली पण काहीही हरकत नाही. आम्ही लाडक्या बहीणींना १६ तारखेला खात्यात पैसे पाठवू. बहिणींचे पैसे आम्ही थांबवू शकत नाही, हे दोन दिवस उशीरा करु शकतो पण आमच्या बहिणींचा पैसा आम्ही थांबवू शकत नाही"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com