Deputy CM Ajit Pawar in action mode after heavy rains lash Baramati sarkarnama
पुणे

Ajit Pawar in Baramati : बारामतीला पावसाचा जबरदस्त फटका अन् अजितदादा तत्काळ ॲक्शन मोडवर!

Heavy Rainfall in Baramati Causes Widespread Damage : राज्यभरात पावसाने अनेक ठिकाणी आता दमदार आगमन केले असून, जनजीवनही विस्कळीत होवू लागले आहे.

Mayur Ratnaparkhe

Heavy rain in Baramati causes damage : राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत होवू लागले आहे. शिवाय, शेत पिकांचे नुकसानही झाल आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतकार्य जोरदार सुरू आहे. शिवाय, प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही तातडीच्या सर्व सूचना केल्या गेल्या आहेत.

मागील दोन दिवसांत बारामती तालुका व शहरात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २६) पहाटेपासूनच बारामती शहर आणि तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. नुकसानीची माहिती मिळताच रविवारी (ता. २५) रात्रीच अजित पवार बारामतीत दाखल झाले होते.दरम्यान झालेल्या सर्व नुकसानीची एकत्रित माहिती गोळा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना तातडीने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. बारामती एमआयडीसीमधील तीन इमारतींना धोका पोहोचण्याची शक्यता आहे, ही बाब विचारात घेऊन बारामती नगरपालिकेने या तिन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. त्यानंतरच नागरिकांना या इमारतीत राहणे शक्य आहे का या बाबतचा निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. नीरा डावा कालवा ज्या ठिकाणी फुटला त्या परिसरासही अजित पवार यांनी भेट दिली.

अजित पवार यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह प्रशासन सर्वच वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यात उपस्थित होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ज्यामध्ये जिथे ओढे अरुंद आहेत तेथे ओढ्यांचे रुंदीकरण करणे,  चाऱ्या व पोटचाऱ्या यांची स्वच्छता करून घेणे,  जिथे लोकांना मदतीची गरज आहे तेथे तातडीने मदत उपलब्ध करून देणे,  पिकांचे आणि घरांचे जे नुकसान झाले आहे त्याचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करणे,  जिथे पाणी साचून राहते आहे, अशा ठिकाणांची माहिती घेऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे आदींचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT