Public Works Department News : मंत्री आले अन् सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू झाले बदल्यांचे वारे!

Nagpur PWD Officer Transfers : राज्यमंत्री इंद्रनिल नाईक नागपूरला येऊन गेल्याने मे महिना संपायच्या आतच बदल्यांचा आदेश निघणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
Nagpur PWD Office
Nagpur PWD Officesarkarnama
Published on
Updated on

Transfer Activity Begins in PWD Nagpur : राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असो, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र आपल्याच नियमाने चाललात. त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयास सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मंजुरी गृहितच धरली जाते. या विभागाला कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा नियमसुद्धा लागू होत नसल्याचे दिसून येते. या खात्याचे मंत्री बदलतात मात्र अधिकारी नाही असे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्र्यांचे पीए नियुक्त करताना त्यांनी कठोर नियम लावले होते. त्याची अंमलबजावणीसुद्धा केली. कर्मचाऱ्यांच्या बदल्यातही हीच भूमिका त्यांनी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

महायुतीच्या सरकारमध्ये चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अशोक चव्हाण तर अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळाच रवींद्र चव्हाण मंत्री होते. सध्या शिवेंद्र राजे भोसले यांना या खात्याचा कारभार देण्यात आला आहे. तत्पूर्वी युती सरकारच्या सर्वात पहिल्या कार्यकाळात नितीन गडकरी यांचे हे खाते चांगलेच गाजवले होते. आघाडीचे सरकार असताना छगन भुजबळ हेसुद्धा अनेक वर्षे या खात्याचे मंत्री होते. प्रत्येक सरकारमध्ये मंत्री बदलले मात्र काही अभियंते मात्र कायम सेवेत रुजू झाल्यापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत.

सध्या सर्वत्र बदल्यांचो मोसम सुरू आहे. मात्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सर्व जोर बदल्यांच्या स्थगितीला आहे. दोनच दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक नागपूरला येऊन गेल्याने मे महिना संपायच्या आतच बदल्यांचा आदेश निघणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या आदेशात सर्व नियम, बंधने झुगारून चार ते सतरा वर्षांपासून एकच जागा, एकाच शहरात चिटकून बसलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur PWD Office
Vilasrao Deshmukh memories : 'हृदय अजूनही एका स्पर्शासाठी अन्...'; विलासरावांच्या जयंतीदिनी रितेश देशमुखांची भावनिक पोस्ट

सार्वजनिक बांधकाम नागपूर विभागांतर्गत शहर सार्वजनिक बांधकाम विभाग 1, विभाग 2, प्रादेशिक बांधकाम विभाग, एकात्मिक घटक वैद्यकीय, उपविभाग, मंडळ कार्यालय तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागात शेकडो अभियंते कार्यरत आहेत. शाखा अभियंता आणि सहायक अभियंता श्रेणी-2 या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसर्दभात काही नियम आहेत. ते बंधनकारकसुद्धा असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. त्यानुसार तीन वर्षांपेक्षा एकाच ठिकाणी त्यांना राहता येत नाही.

Nagpur PWD Office
Asaduddin Owaisi : भाजप सातत्याने निवडणुका का जिंकत आहे? ; ओवैसींनी सांगितले मोठे कारण, म्हणाले...

याचा अर्थ दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. असे असले तरी यापैकी 99 अभियंत्यांना हा नियम लागू होत नसल्याचे दिसून येते. एका शाखा अभियंता शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून उपविभाग क्रमांक एकमध्येच कार्यरत आहे. त्याने 17 वर्षे एकाच ठिकाणी राहण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतरचा विक्रम आठ, सात, पाच, चार वर्षांचा आहे. त्यांचाही विक्रम तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.

माहिती अधिकार कायद्यांर्गत कोणी, किती वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याच्या माहितीतून हे पुढे आले आहे. या सर्वांनी ग्रामीण व दुर्गम भागातून शहरात येणाऱ्यांची वाट अनेक वर्षांपासून अडवून धरली आहे. या यादीत चार वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत असलेले तब्बल 63 तर तीन वर्षे पूर्ण झालेले 39 असे एकूण 99 अभियंते असल्याचे समोर आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com