Anita Gaikwad at NCP office in Baramati before submitting resignation following viral birthday celebration controversy. Sarkarnama
पुणे

Baramati NCP : बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; कारण ठरले वाढदिवस साजरा करतानाची 'ती' व्हायरल क्लिप

Baramati Anita Gaikwad Resignation : बारामती शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी वाढदिवस साजरा करतानाची व्हायरल क्लिप वादानंतर राजीनामा दिला. राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठविण्यात आला असून निर्णय प्रलंबित आहे.

मिलिंद संगई :सरकारनामा

Baramati NCP News : बारामती येथील शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात एका महिलेचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरुन वादंग निर्माण झाल्याने बारामती शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आज (ता. 21) पाठविला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनास काही आठवडयांचाही कालावधी उलटलेला नसताना शारदा प्रांगणातील शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात एका महिलेचा वाढदिवस साजरा करतानाची छायाचित्रे व क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली.

त्या नंतर अनिता गायकवाड यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. या राजीनाम्यावर अद्याप सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला नसल्याचे समजते. दरम्यान बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीत अनिता गायकवाड या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित होत्या, मात्र त्यांचा या निवडणूकीत पराभव झाला होता. त्या नंतरही त्यांचे पद कायम ठेवण्यात आले होते.

एकीकडे शहराध्यक्ष जय पाटील यांच्या जागी किरण इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अनिता गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागते या कडे बारामतीकरांचे लक्ष आहे.

दरम्यान आपल्याला काही जणांनी लक्ष्य केल्याचे अनिता गायकवाड यांनी नमूद केले. तरीही पक्षाच्या प्रतिमेस बाधा येऊ नये. यासाठी आपण स्वताःहून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे अनिता गायकवाड यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT