Pune Police News: वाSSरे पठ्ठ्या! पुण्यात पोलिस चौकीतच 35 हजारांची लाच घेण्याचे धाडस! सोलापुरच्या ACBने आवळल्या मुसक्या

Paud Police Station Bribery Case: पुणे ग्रामीण पोलिस दलातील ही लाचखोरी असल्याने त्यावर कारवाई पुणे एसीबीने केली नाही, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर एसीबी युनीट ने केली.
Pune ACB News
Pune ACB NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आरोपीची गाडी जप्त न करता त्याला मदत करण्यासाठी 35 हजारांची लाच घेताना एका जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले .सचिन शिंदे असे अटक करण्यात आलेल्या जमादाराचे नाव आहे. सध्या तो पौड पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

शिंदे याला 35 हजार रुपयांची लाच घेताना पोलिस चौकीतच सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (ता.२०) पकडले. त्याने एका गुन्ह्यातील आरोपीच्या मदतीसाठी त्याच्याकडे एक लाखाची लाच मागितली होती. त्यानंतर 35 हजारावर तडजोड केली होती.

सचिन बाळासाहेब शिंदे (वय 45,रा.सुसगाव,ता.मुळशी, जि.पुणे) याला पुणे एसीबीचा ट्रॅप न झाल्याने या प्रकरणात ही कारवाई सोलापुरच्या एसीबी युनीट ने केल्याचे समजते. पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी लाचेच्या या कारवाईला दुजोरा दिला आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलातील ही लाचखोरी असल्याने त्यावर कारवाई पुणे एसीबीने केली नाही, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर एसीबी युनीट ने केली.

तीन आठवड्यांपूर्वी (३१ जानेवारी) पुणे ग्रामीण पोलिस दलातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या करंजेपूल आऊट पोस्टचा हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (वय ४२, रा. शारदानगर,माळेगाव,ता.बारामती) याच्याविरुद्ध एका आरोपीला जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल पुणे एसीबी युनीट ने गुन्हा दाखल केला आहे.

Pune ACB News
HSC Paper Leak: धक्कादायक! बारावीचे दोन पेपर फुटले! परीक्षेच्या तासाभरापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअँपवर व्हायरल

या प्रकरणातील तक्रारदारांने पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास हवालदार शिंदे करीत होता.त्यात आरोपीची गाडी जप्त न करता त्याला मदत करण्यासाठी शिंदेने प्रथम एक लाखाची लाच मागितली.मात्र,ती तक्रारदाराला द्यायची नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली.दरम्यान ३५ हजारावर नंतर शिंदेने त़़डजोड केली. ती लाच घेताना त्याला पोलिस चौकीतच रंगेहाथ पकडण्यात आले.

सोलापूर एसीबी युनीटचे पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) प्रशांत चौगले व त्यांच्या पथकाने ही लाचेच्या सापळ्याची कारवाई केली.लाचखोर हवालदार शिंदेवरील या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबी च्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com