

NCP campaign strategy : अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्याच पोटनिवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, हे निश्चित आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी कामाला लागले आहेत.
आगामी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नवीन मतदारनोंदणीसाठी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरूवात बुधवारी (ता. १८) करण्यात आली. यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे, महिलाध्यक्षा अनिता गायकवाड, युवकाध्यक्ष अभिजित घाडगे, बारामती बँकेचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री आताच करून घ्यावी, जेणेकरून मतदानाच्या दिवशी अडचण होणार नाही, असे आवाहन बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
पक्षाने शारदा प्रांगणासमोर मतदारांच्या सुविधेसाठी कक्ष सुरू केला आहे. दरम्यान, मतदारयादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी नवमतदारांनीही २५ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, जेणेकरून त्यांचे नाव यादीत समाविष्ट करणे शक्य होणार असल्याचे किरण इंगळे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांचे २८ फेब्रुवारी रोजी बारामतीत विमान अपघातात झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अजितदादांच्या निधनानंतर चार दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांत विधिमंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.