Ajit Pawar, Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Political News : मडकं फोडलं अन् रान पेटलं; बारामतीत नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Vs Rohit Pawar : माळेगाव येथील एक सभेत अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडके फोडले. सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाही तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे ते मडके फोडताना म्हणाले होते.

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी थेट लढत होत आहे. मात्र येथे खरी लढत ही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तित्वाची मानली जाते. बारामती राखण्यासाठी दोन्ही नेते तळ ठोकून आहेत. दोन्ही बाजुकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच अजित पवार गटातील पदाधिकाऱ्याने भरसभेत मडके फोडल्याने आता बारामतीतील राजकीय वातावरण तापले आहे.

माळेगाव येथील एक सभेत अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे Ravraj Taware यांनी लोकांसमोर मडके फोडले. सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाही तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे ते मडके फोडताना म्हणाले होते. तावरेंची कृती आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले आहे.

रोहित पवारांनी Rohit Pawar सांगता सभेत तावरेंचा मडके फोडल्याचा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर मडके कधी फोडले जाते? लोक कशाची वाट पाहतात, असे सवालही केले. त्यानंतर त्यांना भावना अनावर झाल्या. जितेंद्र आव्हाडांनी ट्विटद्वारे हा प्रकार अघोरी विद्येतून घडल्याचा आरोप केला. मडके कोणी फोडले, कशासाठी फोडले, यापेक्षा पुरोगामी शरद पवार यांच्या बारामती परिसरात मडके फोडले गेले आहे. हे मडके फोडायला ज्याने सांगितले, त्याच्या मनालाच हे मडके का फोडले, हे माहीत असेल, असा हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तावरेंच्या मडके फोडण्यावर अजित पवारांनीही Ajit Pawar सांगता सभेत उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मडके फोडणार कोण आहे, हे मला माहीत नाही. तर आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, अजितदादांच्या आदेशानुसार विकासाच्या मुद्द्यावर आमचा प्रचार सुरू आहे. मात्र मटका फोडल्यावरून त्यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले. दुष्काळी भागातील महिलांच्या डोक्यावर हंडा असतो. आता विकासाच्या मार्गावरून जाताना कोरडा हंडा काय कामाचा. मग तो फेकलेला बरा, असा तावरेंच्या म्हणण्याचा अर्थ होता. मात्र अनेक मोठ्या सभा घेतल्यानंतर त्यांना सामान्य कार्यकर्त्याच्या या कृतीची दखल घ्यावी लागली, असा टोलाही मिटकरींनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT