Amol Kolhe : विखेंकडे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, पण लंकेकडे काय? बच्चनच्या स्टाईलमध्ये कोल्हेंनी सांगितलं...

Nilesh Lanke : आता 2024 ला परत गॅस सिलिंडरलाच नमस्कार करून मतदान करायला जा. पण गॅस सिलिंडरला एकदा नमस्कार करून चालायचे नाही. किमती तिप्पट वाढल्याने, त्रिवार नमस्कार गॅस सिलिंडरला करा.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे यांनी नगरच्या सभेत अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 'दिवार' चित्रपटातील डायलाॅग बोलून दाखवला. नगर दक्षिणचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्याकडे काय आहे, हे सांगताना खासदार कोल्हे यांनी हा डायलाॅग बोलला आहे.

शिरूर लोकसभेची जशी परिस्थिती आहे, तशीच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची स्थिती आहे. शिरूर मतदारसंघात मुख्यमंत्री चारवेळा येऊन गेले. एक उपमुख्यमंत्री पाच वेळा येऊन गेले. आता उद्या परत येणार आहे.

दुसरे उपमुख्यमंत्री मोकळे होत आहे. त्यानंतर ते तर शिरूर मतदारसंघातच असतील. नगरमध्ये अशाच काही सहा, सात, आठ, अशा मोठ-मोठ्या सभा लागल्यात. यावेळी 'दिवार' सिनेमा आठवतो का? 'मेरा पास गाडी, बंगला, तुम्हारे पास क्या है..?' यानंतर प्रश्न तोच येतो,

आमच्याकडे मुख्यमंत्री आहे. दोन-दोन उपमुख्यमंत्री आहे. 200 आमदार आहे. अफाट पैसा आहे. पाच पिढ्यांचे राजकारण आहे. यंत्रणा आहे. राज्यातील आणि केंद्रातील सत्ता आहे. तर नीलेश लंके Nilesh Lanke तुमच्याकडे काय आहे? यावर नीलेश लंके सांगतात, माझे मायबाप जनता आहे. ही जनतेची निवडणूक आहे, असे खासदार कोल्हे यांनी म्हणताच सभेत शिट्या, टाळ्यांचा जोरदार आवाज झाला.

Amol Kolhe
Bajrang Sonwane : साहेब, आता फक्त तब्येतीला जपा; विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! बजरंग सोनवणेंची भावनिक साद

अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी भाजपचे नगरमधील खासदार सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. 'अमोल कोल्हे संसदेत घोड्यावरच होते. नगरमध्ये सुद्धा घोड्यावर होते. परंतु कदाचित त्यांना विसर पडला असेल, नगरमध्ये पहिल्यादांचा घोड्याच्या टापा उधळल्या, त्यावेळी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी नगर शहरांमध्ये पहिला महानाट्याचा प्रयोग घेतला होता.

त्यानंतर स्वतः मान्यवर खासदार जेव्हा राजकारणात येत होते, तेव्हा शिर्डीत तोच घोडा दौडून आला होता. संगमनेरमध्ये तोच घोडा दौडला. आता पुन्हा नगरमध्ये तोच घोडा दौडून आला. आता घोडा या प्राण्यावर फारच प्रेम असेल तर.., मी एवढंच म्हणतोय, खासदार साहेब तुम्ही झाल्यानंतर आपण परत एकदा प्रयोग करू, एवढंच म्हणणं होतं बाकी काही माझं वेगळे म्हणणे नव्हते', अशी शेलकी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

Amol Kolhe
Solapur Lok Sabha 2024: मतदानासाठी सोलापूर प्रशासन सज्ज; मोहोळमध्ये सव्वातीन लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

2029 ची तजवीज आताच करताय का?

नगर दक्षिण Ahmednagar लोकसभा मतदारसंघाच्या विषयी अमोल कोल्हे यांनी नवल व्यक्त केले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर, मोठे नेते येतात ते शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये जातात. मते द्यायची ती नगर दक्षिणने आणि पंतप्रधान आले ते शिर्डी लोकसभेत. गृहमंत्री आले तर ते शिर्डी लोकसभेत. त्याचे कोडे आता उलगडले आहे.

2029 ला लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे आताच 2029 च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेची तजवीज करत आहे का? करा, पण नगर दक्षिणचे माणसेही साधी नाहीत. आता उत्तरेचा पार्सल उत्तरेला पाठवायचे.

2029 ला जो माणूस मत मागायला येणारच नाही, तो तुमची काम काय करणार, एवढे तर दक्षिण नगरच्या प्रत्येक सुज्ञ मतदाराला व्यवस्थित कळते, असे म्हणत नीलेश लंके यांना साथ देण्याचे आवाहन कोल्हेंनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधानानी 2014 ला काय सांगितले होते की, गॅस सिलिंडरला नमस्कार करून मतदानाला जा. हे आठवते का? आता 2024 ला परत गॅस सिलिंडरलाच नमस्कार करून मतदान करायला जा. पण गॅस सिलिंडरला एकदा नमस्कार करून चालायचे नाही. किमती तिप्पट वाढल्याने, त्यामुळे त्रिवार नमस्कार गॅस सिलिंडरला करा.

गॅस सिलिंडरच्या बाजूला खताची गोण ठेवा. त्या खताच्या गोणीला तीनदा नमस्कार करा. एवढंच नाही तर मतदानाला जाताना आपल्या नात्यागोत्याचा पाहुण्यांना नाहीतर घरातला कुणी बेरोजगार असेल तर त्याचा ओढलेला चेहरा डोळ्यासमोर ठेवा आणि मग मतदानाला जा. हे अपेक्षाभंग करणारे सरकार खाली खेचण्यासाठी येत्या तीन तारखेला महाविकास आघाडीबरोबर राहा, असे देखील आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Amol Kolhe
CM Shinde : एकनाथ शिंदेंच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय! प्रचार रॅली सोडून हात भाजलेल्या रूंद्राशच्या मदतीला धावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com