Baramati Bypoll 2026 Final Result Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar Win: 64 वर्षांनंतर बारामतीचा कारभार महिलेच्या हाती! सुनेत्रा पवार ठरल्या दुसऱ्या महिला आमदार

Baramati Bypoll 2026 Final Result Sunetra Pawar Win: मालतीबाई शिरोळे या बारामच्या पहिला महिला आमदार होत्या. आता सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत.

Mangesh Mahale

Baramati Politics History: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या विजयी झाल्या आहेत. 2 लाख 18 हजार 930 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. बारामतीच्या त्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे.

१९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे (माई ) यांच्या रूपाने बारामतीला पहिल्या महिला आमदार मिळाल्या होत्या. अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या विजयी झाल्या आहेत. बारामतीच्या राजकारणात ६४ वर्षांनंतर पुन्हा एकदा महिलेचा हाती कारभार आला आहे.

१९६२ मध्ये निवडून आलेल्या मालतीबाई शिरोळे यांना त्यावेळी सर्वजण आदराने 'माई' म्हणत असत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात आईच्या मायेने उभ्या राहण्याच्या वृत्तीमुळे हे नाव जनमानसात रूढ झाले. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांना बारामतीची जनता गेली तीन दशके 'वहिनी' या नावाने ओळखते. 'माईं'नंतर आता 'वहिनीं'च्या रूपाने बारामतीला पुन्हा एकदा तो मायेला ओलावा बारामतीकरांना अनुभवायला मिळणार आहे.

१९६२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला आणि बारामतीचा आवाज पहिल्यांदा एका महिलेच्या रूपाने विधानसभेत पोहोचला.स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला नेत्यांमध्ये बारामतीच्या पहिल्या महिला आमदार मालतीबाई शिरोळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न त्या काळी अत्यंत प्रभावीपणे मांडले. १९६७ पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर बारामतीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या रूपाने नव्या पिढीकडे आले. सुनेत्रा पवार या १९६२ नंतर बारामतीला मिळणाऱ्या पहिल्याच महिला आमदार ठरल्या आहेत.

मालतीबाई शिरोळे यांच्यानंतर बारामतीच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉईंट आला तो शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आगमनाने. १९६७ मध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदा बारामतीतून विधानसभा निवडणूक जिंकत आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली.

शरद पवार यांच्यानंतर बारामती विधानसभेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले. अजित पवार यांनीही या मतदारसंघातून अनेकदा विजय मिळवून आपली मजबूत पकड सिद्ध केली. आता सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाखाली बारामतीच्या विकासाची धुरा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT