BJP MLA Sunil Kamble Sarkarnama
पुणे

Sunil Kamble Video: पोलिसाच्या कानशिलात लगावल्यानंतर आमदार कांबळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

BJP MLA Sunil Kamble beat NCP office bearer : पुण्याच्या ससून रूग्णालयात हा प्रकार घडला

Ganesh Thombare

Pune News:

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याला भाजप आमदार सुनील कांबळे यांनी कानाखाली लगावल्याचे समोर आले आहे. ससून रूग्णालयात हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

यानंतर ससूनमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायाला देखील आमदार कांबळे यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर याआधीही आमदार कांबळे यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या सर्व प्रकारानंतर आमदार कांबळे यांनी प्रतिक्रिया देत आपण मारहाण केली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, या प्रकारामुळे आमदार कांबळे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कांबळे काय म्हणाले ?

'मी व्यासपीठावरून खाली उतरत असताना तो आडवा आला. त्यामुळे मी त्याला ढकलून बाजूला होत तेथून पुढे गेलो. मारहाण करायची असती तर तिथे थांबलो असतो. पण मी पुढे आलो', अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना दिली. तसेच व्हिडिओ संदर्भात बोलताना ते म्हणाले, 'मारहाण करायची, कानशीलात मारण्याची पोझिशन काय असते ?' असा उलट सवालच त्यांनी उपस्थित केला. तसेच कोणाला मारहाण करण्याचा काही संबंध नसून आपण त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

नेमकं काय घडलं?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकारातून ससून रुग्णालयामध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष वॅार्ड तयार करण्यात आला. या वॅार्डचे उद्घाटन करण्यासाठी तसेच ससूनमधील कामांची पाहणी करून त्याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येथे आले होते.

यावेळी आमदार सुनील कांबळे तेथून बाहेर पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याशी त्यांची शाब्दिक बाचबाची झाली. त्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असताना कांबळे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकारानंतर आमदार कांबळे यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT