Rupali Chakankar News : हे तर राजकारणातून आलेलं नैराश्य, रुपाली चाकणकर कडाडल्या

Ajit Pawar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची शालिनीताई पाटलांवर टीका
Rupali Chakankar, Shalini Patil
Rupali Chakankar, Shalini PatilSarkarnama

Pune News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढील चार महिन्यात तुरुंगात जातील, त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिल, अशी टीका महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी खासदार शालिनी पाटील यांनी केली होती. त्यांच्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राजकारणातून आलेले नैराश्यातून पाटील बोलत असल्याची टीका त्यांनी केली.

चाकणकर म्हणाल्या, शालिनी पाटील या ज्योतिष सांगणाऱ्या माणसाप्रमाणे राजकीय भविष्यवाणी करत असतात. इतकेच काय तर त्यांनी पांडित्य करताना इतिहासात जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील सोडलेले नाही. त्या मागे म्हणाल्या 'गांधी नेहरु जेंव्हा तुरुंगवास भोगत होते तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्या सरकारमध्ये मंत्री होते, भारतातील सगळ्या बातम्या तेंव्हा ब्रिटिश गर्व्हमेंटला बाबासाहेब सांगायचे" इतकी तर त्यांची हुशारी आहे. त्या सातत्याने कोणावर ना कोणावर आरोप करतच असतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rupali Chakankar, Shalini Patil
Pimpri Chinchwad Politics : राहुल कलाटे आता तुम्ही आमदार होणार का? वाघेरेंच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण

त्यांना आता प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला पाहिजे की, तुम्ही अजितदादांवर बोलतात, साहेबांवर बोललात, तुम्ही वसंतदादा पाटील यांच्यावर पण बोललात इतकच तुम्हाला राजकीय भविष्य कळत होते तर तुमच्या स्वतःचे भविष्य समजले नाही का ? त्यांची ही वक्तव्य म्हणजे त्यांना राजकारणातून आलेलं नैराश्य आहे. हे नैराश्य त्या टीका करून भरुन काढत असतात. त्यामुळे शालिनी पाटील यांना यापेक्षा अधिक महत्व देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारुन पक्षातील महत्वाच्या नेत्यांना घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयानंतर शालिनी पाटील यांनी कडक शब्दात टीका केली होती. भाजपच्या आश्रयाला गेले ही अजितदादांची चुक शरद पवार हिशोब चुकता करतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच अजित पवार घोटाळेबाज असून स्वार्थी असल्याची टीका देखील त्यांनी केली होती.

Rupali Chakankar, Shalini Patil
Chandrapur News : मुनगंटीवारांनी दिली अशी भेट, शिंदे-फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्यच फुलले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com