Best Credit Society Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधले होते. पण या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या उत्कर्ष पॅनेलचा मोठा पराभव झाला. या निकलावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधुंवर सडकून टीका केली आहे. ठाकरे ब्रँड रिजेक्ट झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली. या निवडणुकीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन या पॅनेलचे 12 उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलचे 9 उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "माझं याबाबत मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकारण करण्यात येऊ नये. कारण ही पतपेढीची निवडणूक होती, मात्र त्यांनीच या निवडणुकीचं राजकारण केलं. या निवडणुकीत शशांक राव हे देखील आमचेच होते आणि प्रसाद लाड देखील आमचेच होते. मात्र, आम्ही त्या निवडणुकीचं कोणतंही राजकारण केलं नाही. मात्र समोरुन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळं ठाकरे ब्रँड निवडून येणार अशा पद्धतीने वल्गना करून या निवडणुकीचं राजकारण केलं गेलं. मात्र, हे लोकांना आवडलेले दिसत नाही त्यामुळे त्यांना या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे या निवडणुकीत तरी लोकांनी त्यांना रिजेक्ट केलेला आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे"
दरम्यान, राज्यातील पावसाळी परिस्थितीच्या आढाव्याबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले, "राज्याची परिस्थिती कंट्रोलमध्ये आली आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अद्यापही रेड अलर्ट असून त्या दृष्टिकोनातून एनडीआरएफ, एसडीआरएफची पथक तैनात ठेवून इतर विभागामार्फत देखील काळजी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणच्या नद्या इशारा पातळीच्यावर वाहत आहेत. त्या ठिकाणी धरणांचा विसर्ग वाढून अथवा कमी करून मॅनेजमेंट करण्याचं काम सुरू आहे. तसंच याबाबत इतर राज्यांशी ही चर्चा सुरू असून आपल्या विनंतीनुसार ती राज्य देखील विसर्ग वाढवत आहेत. अजून जास्त विसर्ग वाढवण्याची गरज पडल्यास त्यासाठी देखील इतर राज्यांशी संपर्क करू"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.