MH Electoral Roll: महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात 10,000 बोगस मतदार! भाजपविरोधी 'लाल रंगात', समर्थक 'हिरव्या रंगात'...; मविआचा खळबळजनक आरोप

MH Electoral Roll: मतदारांच्या संख्येत झालेल्या चढउताराबाबत दावा केल्यानंतर नाट्यमयरित्या माघार घेऊन सीएसडीएसच्या संचालकांनी माफीनामा सादर केला होता. यामुळं भाजपकडून काँग्रेसवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

MH Electoral Roll: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत झालेल्या चढउताराबाबत दावा केल्यानंतर नाट्यमयरित्या माघार घेऊन माफीनामा सादर केलेल्या सीएसडीएसच्या संचालकांच्या कृतीमुळं काँग्रेसवर भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. पण अद्यापही महाविकास आघाडी आपल्या आरोपांवर ठाम असून राज्यात मतदार याद्यांमध्ये घोळ सुरु असल्याचं आघाडीनं निवडणुकीआधीच निवडणूक आयोगाला सतर्क केलं होतं, असं मविआनं म्हटलं आहे. तसंच प्रत्येक मतदारसंघात १०,००० बोगस मतदार असल्याचा दावाही केला. यासाठी पद्धतशीरपणे तंत्रज्ञानाच्या मदतीनं लोकशाहीवर हल्ला करण्यात आलाचा गंभीर आरोपही केला.

Jitendra Awhad
Nitesh Rane: 'वराह भगवान' जयंती राज्यभरात साजरी व्हावी! शाळांमध्ये व्याख्यानं आयोजित करा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी मविआची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, विधानसभा निवडणुकीपूर्वीच मविआनं बोगस मतदानासंबंधी निवडणूक आयोगाला सतर्क केलं होतं. विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात जे घडलं तो केवळ निवडणूक गैरप्रकार नव्हता तर लोकशाहीवर एक पद्धतशीर, तंत्रज्ञानानं चालविलेला हल्ला होता. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी, मतदान सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाला औपचारिकपणे भाजपकडून अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार फसवणूक केल्याबद्दल सतर्क केलं होतं. ही निवडणूकोत्तर तक्रार नव्हती, ती पूर्वसूचना होती, असं ठळकपणे त्यांनी सांगितलं आहे.

Jitendra Awhad
Lok Sabha Session Update : लोकसभेत प्रचंड गदारोळ; अमित शहांच्या अटकेचा मुद्दा अन् विधेयक फाडून अंगावर फेकले…

फसव्या याद्या सादर केल्या

भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदार ओळखण्यासाठी आणि त्यांना हटविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करत होते. तर बनावट आधार कार्ड आणि डेटामध्ये फेरफार करून बनावट मतदार कसे जोडत होते याचे तपशीलवार वर्णन आम्ही आमच्या निवडणूक आयोगाकडं केलेल्या तक्रारीत केलं होतं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना विरोधी मतदारांना लाल रंगात चिन्हांकित केले गेलं होतं म्हणजेच त्यांना हटवण्याचं लक्ष्य होतं.

तर भाजप समर्थकांना हिरवं चिन्हांकित केलं गेलं होतं, म्हणजेच काढून टाकण्यापासून सुरक्षित ठेवण्यात आलं होतं. या याद्या निवडणूक आयोगाच्या मतदार मान्यता प्रणालीवर परिणाम करणाऱ्या खाजगी सर्व्हरवर अपलोड केल्या गेल्या. फसव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी सायबर कॅफे आणि आधार सेतू केंद्रांचा वापर करण्यात आला. याद्वारे प्रत्येक मतदारसंघात अंदाजे १०,००० बनावट मतदारांची नोंदणी केली गेली, असा गंभीर आरोपही मविआकडून करण्यात आल्याचं आव्हाडांनी सांगितलं.

Jitendra Awhad
Delhi CM Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर एवढा राग का? रेखा गुप्तांआधी केजरीवालांवर तब्बल 9 वेळा हल्ला

धाराशिवयध्ये एकावर गुन्हा दाखल

१७ ऑक्टोबर रोजी, निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्यानं धाराशिवमध्ये एफआयआर दाखल केला. ज्यामध्ये तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणींचा पूर उघडकीस आला होता. त्यात सहभागी असलेल्यांची नावं घेतली आणि हे किती खोलवर गेले आहेत हे दाखवून दिलं. आम्ही १३ मतदारसंघांमधून ठोस पुरावे सादर केले होते. यामध्ये शिर्डी, चंद्रपूर, कोथरूड, नागपूर, गोंदिया आणि इतर मतदारसंघांचा समावेश होता.

तरीही, निवडणूक आयोगानं मौन बाळगलं, पण आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही भाजपला आमचं संविधान आणि लोकशाही चिरडून टाकू देणार नाही, आम्ही लढू कारण लोकशाही केवळ निवडणूक रणनीतींबद्दल नाही, तर विश्वासावर आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतीय संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थांना मार्गावरून हटवू देणार नाही, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com