Election
Election

Co-Operative Society Election: सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक! पुढे ढकलेल्या निवडणूक कधी होणार? जाणून घ्या

Co-Operative Society Election: पुढे ढकलण्यात आलेल्या या निवडणुका नंतर कधी होणार? याचं वेळापत्रकही निवेदनात जाहीर करण्यात आलं आहे.
Published on

Co-Operative Society Election : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पु़ढे ढकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणानं घेतला आहे. राज्यभरात सध्या पावसानं थैमान घातल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसंच पुढे ढकलण्यात आलेल्या या निवडणुका नंतर कधी होणार? याचं वेळापत्रकही निवेदनात जाहीर करण्यात आलं आहे.

Election
MH Electoral Roll: महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात 10,000 बोगस मतदार! भाजपविरोधी 'लाल रंगात', समर्थक 'हिरव्या रंगात'...; मविआचा खळबळजनक आरोप

कुठल्या निवडणुका पुढे ढकलल्या?

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ मधील नियम ४ मध्ये नमुद केलेल्या 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पु़ढे ढकलण्यात येत आहेत.

Election
Nitesh Rane: 'वराह भगवान' जयंती राज्यभरात साजरी व्हावी! शाळांमध्ये व्याख्यानं आयोजित करा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोणत्या संस्थांना वगळलं?

पण ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे, अशा संस्था तसंच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे असा संस्था, त्याचबरोबर ज्या कारणासाठी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेश हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टानं दिले आहेत, अशा संस्थांना या निर्णयातून वगळण्यात आलं आहे.

कधीपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या?

शासनानं १९ ऑगस्ट २०२५ रोजी काढलेल्या आदेशापासून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शासनाच्या या आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून संबंधित सहकारी संस्थांना देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com