Pune News Sarkarnama
पुणे

Pune Traffic Police: पुणेकरांनो सावधान, ...तर तुमचा वाहन परवाना निलंबित होऊ शकतो!

Pune Traffic Rules: गेल्या साडेतीन महिन्यांत सुमारे अडीच हजार दुचाकीस्वारांवर कारवाई...

सरकारनामा ब्यूरो

अनिल सावळे

Pune News :पुणे शहरात अनेक दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचं पालन होत नसल्याचं समोर आलं आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट बसून भरधाव दुचाकी चालविणे, नो एंट्रीमधून, विरुद्ध दिशेने आणि ओव्हरटेक करून जात असल्याच्या घटना अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. यामुळे अनेकदा अपघातही घडतात. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुणे वाहतूक पोलिसांनी बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुणे शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट दिसल्यास वाहन परवानाही निलंबित करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा वाहतूक पोलिसां(Traffic Police)नी दिला आहे. तसेच मागील साडेतीन महिन्यांत सुमारे अडीच हजार दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलीस विभागानं कारवाई केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत सुमारे अडीच हजार दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. आणि या बेशिस्त दुचाकीस्वारांकडून तब्बल २४ लाख ५३ हजार ३५० रुपये दंड वसूल केला आहे.

शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे, पाईपलाईन यांसारखे अनेक कामं सुरु आहेत. यामुळे वाहनचालकांसह पादचारी नागरिकांनाही प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. याचदरम्यान,शहरात दुचाकीवर ट्रिपलसीट बसून भरधाव जाणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अशा बेशिस्त दुचाकीस्वारांचा वाहन परवाना निलंबित(Suspension) करण्यात येणार आहे. तसेच, दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणे दुचाकीस्वारांना चांगलेच महागात पडणार आहे.

याबाबत पुणे(Pune) शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले, बेशिस्त दुचाकीस्वारांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. दुचाकीवर ट्रिपलसीट, मोबाईलवर बोलणे, मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या ३१ मार्चपासून आत्तापर्यंत अशा ५७२ वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. २४ जानेवारी ते १० मे २०२३ या कालावधीत तब्बल २ हजार ४७७ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ लाख ५३ हजार ३५० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT