Bhagwan Pawar  Sarkarnama
पुणे

Bhagwan Pawar News : तानाजी सावंतांवरील आरोप भगवान पवारांना पडणार महागात ?

Tanaji Sawant News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत मंत्री तानाजी सावंत यांच्या वरती अप्रत्यक्षरीत्या गंभीर आरोप केले आहेत. आता भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune Latest News : महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे पालिकेत आरोग्य प्रमुख पदावरती कार्यरत असणाऱ्या डॉ. भगवान पवार यांचे नुकतेच निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवत मंत्री तानाजी सावंत यांच्यावरती अप्रत्यक्षरीत्या गंभीर आरोप केले आहेत. आता भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) पत्र पाठवत काही खळबळजनक खुलासे केले आहेत. पत्रामध्ये त्यांनी एक मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची कामं करण्यास सांगितल्याचं नमूद केला आहे. तसेच इतर आरोग्य विषयक खरेदी प्रकरणात दबाव आणला, असा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. या प्रकारांना नकार दिल्याने माझ्यावरती आकस पोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचा देखील पत्रामध्ये नमूद केला आहे.

आता निलंबित वैदयकिय अधिकारी डॉ भगवान पवार (Dr. Bhagwan Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भगवान पवार यांनी केलेले आरोप त्यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. शासनाकडून पवार यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पवार यांना पुढील तीन दिवसांमध्ये खुलासा करण्यास सांगितला तसे न केल्यास त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दबाव टाकून निलंबनाची कारवाई केल्याबाबतच्या आरोपाची प्रत पवार यांनी 24 मे ला विहित मार्गाने शासनानाला दिल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र 25 मे व 26 मे रोजी शनिवार, रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी असल्याने ते निवेदन पत्र शासनाकडे 27 मे रोजी प्राप्त झाले. त्यापूर्वीच पवार यांच्या निवेदनाच्या बातम्या माध्यम व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या, अनेक लोकप्रतिनिधींनीही त्या समाजमाध्यमांवर पोस्ट झाल्याने शासनाची बदनामी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे निवेदन पवार यांनीच प्रसारमाध्यमांना पुरवल्याचा ठपका या नोटीशीतून ठेवत, पवार यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तवणूक नियम 1979 मधील नियम 3 व 9 चा भंग केल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या नोटीसला पवार हे काय उत्तर देणार का त्यांच्यावरती शासन शिस्तभंगाची कारवाई करणार हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT