Pune Porsche Accident : अपघातग्रस्त पोर्श कारची पोलिसांना काळजी; महत्त्वाचे पुरावे मिळणार...

Pune Hit And Run Case Update : अपघातावेळी कारचा वेग, ब्रेक स्थिती तसेच गाडीच्या पुढील आणि मागील भागात लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघाताचे चित्रीकरण अशा अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागू शकतात.
Pune Porsche Car
Pune Porsche CarSarkarnama

Pune News : कल्याणीनगर अपघातात दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली पोर्शे कार पोलिसांच्या तपासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या कारच्या सीसीटीव्ही आणि अन्य टेक्निकल साधनांमधून अपघात प्रकरणांमधील महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून विशेष काळजी पुणे पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

अपघातावेळी कारचा वेग , ब्रेक स्थिती तसेच गाडीच्या पुढील आणि मागील भागात लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघाताचे चित्रीकरण अशा अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागू शकतात. त्यामुळे पुढील काळामध्ये या कारच्या Porsche Car तपासणीसाठी जर्मनीतील प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही केस आणखी मजबूत करण्यासाठी पोलिसांकडून जास्तीत जास्त पुरावे गोळ्या करण्यात येत आहेत. या पुराव्यांच्या आधारे आरोपींचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हा पोलिसांचा उद्देश आहे.

Pune Porsche Car
Pune Porsche Accident : अजय तावरेचा विशाल अगरवालला सल्ला; रक्त बदलले, तर...

दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली पोर्शे कार जर्मनीमधील कंपनीने बनवलेली आहे. अत्यंत महागडी असणाऱ्या या कारमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अपघाता वेळी गाडीच्या पुढील आणि मागील भागात लागलेल्या सीसीटीव्ही च्या माध्यमातून अपघाताचे चित्रीकरण अशा अनेक गोष्टी पोलिसांच्या Police हाती लागू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गाडीचा स्पीड, बेक्रची स्थिती अपघातावेळी काय होती, गाडीतील सीसीटीव्ही या गोष्टी मिळवण्यासाठी पोलिसांना जर्मनीमधील या कंपनीच्या प्रतिनिधींची मदत लागू शकते. त्यामुळे पुढील काळामध्ये या कारच्या तपासणीसाठी जर्मनीतील प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तत्पूर्वी काही दिवसांत पुण्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे या पावसामध्ये गाडीमध्ये असलेले पुरावे नष्ट होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

पोलिसांनी गाडीला पूर्णपणे ताडपत्रीच्या साह्याने पॅक बंद केला आहे. यामुळे हे टेक्निकल पुरावे नष्ट होणार नाहीत. या उपाययोजनेमुळे टेक्निकल पुराव्यांची आवश्यकता पोलिसांना आहे ते पावसात धुतले जाणार नाहीत, असा विश्वास पोलिसांना आहे.

(Edited By Roshan More)

Pune Porsche Car
Pune Porsche Accident : माज उतरेना! बाप-लेकाकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे; चालकाचे धक्कादायक खुलासे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com