Bhagwan Pawar : डॉ. भगवान पवार निलंबन प्रकरण, आरोग्य विभागानं दिलं 'हे' स्पष्टीकरण

Health Department News : जाणून घ्या, निलंबनाचा निर्णय नेमका कोणत्या तक्रारींमुळे घ्यावा लागला असल्याचे सांगण्यात आले आहे.
Bhagwan Pawar
Bhagwan PawarSarakarnama

Pune News : पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख या पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर भगवान पवार यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत एका मंत्र्यावरती गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून देखील करण्यात येत आहे.

प्रशासनाने मंत्राच्या दबावाखाली येऊन त्यांचं निलंबन करण्यात आलं असल्याची टीका होत असतानाच आता भगवान पवार यांच्या निलंबनावर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.

'जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार(Bhagwan Pawar) यांच्याविरुद्ध आर्थिक भ्रष्टाचार, लैंगिक छळ यांसारख्या विविध तक्रारी प्राप्त होत्या. या प्रलंबित तक्रारींची दखल राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने घेतली आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीने महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.' असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhagwan Pawar
PMC News : मोठी बातमी! आरोग्यमंत्री सावंतांचा 'डोस'; डॉ. भगवान पवारांना पुणे महापालिकेतून 'डिस्चार्ज'

याशिवाय 'डॉ. पवार यांना बडतर्फ नव्हे तर निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात चौकशी अधिक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी त्यांना नंदुरबार(Nandurbar) येथे मुख्यालय देण्यात आले आहे. या चौकशी दरम्यान त्यांना आणि संबंधित तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी आहे.'

'डॉ. भगवान पवार यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे यासह आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप शासनास प्राप्त झाले होते. सतत तक्रारी प्राप्त होत असल्याने 29 एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाने सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असलेली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती.' अशीही माहिती दिली गेली आहे.

Bhagwan Pawar
Pune Hit And Run Case : ससून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील तिसरा मासा पोलिसांच्या गळाला!

पवार यांच्याविरुद्धच्या तक्रारींचे गंभीर स्वरुप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्यादृष्टिने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 (1) (अ) मधील तरतुदीनुसार त्यांचे निलंबन करणे आवश्यक आहे अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यांच्यावर चौकशी समितीने विविध आरोप ठेवले आहे.

Bhagwan Pawar
Rohit Pawar : 'डॉक्टर एकनाथ शिंदेंना मी विनंती करतो, लवकरात लवकर...' ; रोहित पवारांनी लगावला टोला!

पुढील सविस्तर चौकशी व विभागीय चौकशी करण्यात येणार आहे यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Bhagwan Pawar
Devendra Fadnavis News : भुजबळांच्या 'त्या' विधानानंतर फडणवीस म्हणाले, "विधानसभेला भाजपला जास्त जागा मिळतील, पण..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com