Indapur Bazar Samiti Result
Indapur Bazar Samiti Result  Sarkarnama
पुणे

Bazar Samiti Result : भरणे-जगदाळे गटाची इंदापूर बाजार समितीवर पुन्हा सत्ता : विधानसभेला तुटलेली जोडी पुन्हा एकत्र

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar samiti) पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बिनविरोध झालेल्या 4 जागा व निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 14 अशा एकूण 18 जागा जिंकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. माजी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या गटाने बाजार समितीत सत्ता मिळविली आहे. विधानसभा निवडणुकीत तुटलेली ही जोडी पुन्हा एकत्र दिसली आहे. (Bharne-Jagdale group rule over Indapur Bazar Samiti)

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची साठी 18 जागांपैकी बिनविरोध झालेल्या 4 जागा वगळता उर्वरित 14 जागांसाठी शुक्रवार (ता.28) रोजी 96.11 टक्के मतदान झाले होते. यामध्ये शेतकरी विकास पॅनल व स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल या दोन्हीही पॅनलसह काही अपक्षांमध्ये लढत झाली होती. शनिवार (ता.29) रोजी झालेल्या मतमोजणी मध्ये शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व 14 उमेदवारांनी विजय मिळविला. तर बिनविरोध झालेल्या 4 जागांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी आ.यशवंत विठ्ठल माने, व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागेसाठी दशरथ नंदू पोळ, रौनक किरण बोरा व हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेसाठी सुभाष ज्ञानदेव दिवसे यांचा समावेश आहे.

मतमोजणी केंद्रावर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आ.यशवंत माने, आप्पासाहेब जगदाळे यांचेसह विजयी उमेदवारानी गुलालाची उधळण करीत फटाक्याची अतिषणाजी करीत विजय उत्सव साजरा केला.

शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

कृषी पतसंस्था सर्वसाधारण गट

आप्पासाहेब नामदेव जगदाळे(2237)

विलास सर्जेराव माने (2244)

दत्तात्रय सखाराम फडतरे (2271)

संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर (2287)

रोहित वसंत मोहोळकर (2275)

मनोहर महिपती ढुके (2038),

संदीप चित्तरंजन पाटील (2227)

कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी

रूपाली संतोष वाबळे(2152),

मंगल गणेशकुमार झगडे (2126)

कृषी पतसंस्था विमुक्त जाती भटक्या जमाती

आबा गणपत देवकाते (2256)

कृषी पतसंस्था इतर मागास प्रवर्ग

तुषार देवराज जाधव (2376)

ग्रामपंचायत सर्वसाधारण

मधुकर विठोबा भरणे (866)

संतोष नामदेव गायकवाड (767)

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक

अनिल बबन बागल (789)

शेतकरी विकास पॅनलचे बिनविरोध उमेदवार

आमदार यशवंत विठ्ठल माने, दशरथ नंदू पोळ, रौनक किरण बोरा आणि सुभाष ज्ञानदेव दिवसे.

आगामी काळात अपूर्ण कामे पूर्ण करणार : जगदाळे

बाजार समितीमध्ये मतदारांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून आगामी काळात मागील पाच वर्षात काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळाला बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहे, माजी सभापती तथा शेतकरी विकास पॅनेलचे आप्पासाहेब जगदाळे यांनी स्पष्ट केले.

मतदारांनी दिलेला कौल मान्य : महारुद्र पाटील

इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व बलाढ्य नेते एका बाजूला असताना सर्वसामान्य सभासदाला बरोबर घेऊन पॅनल उभा करून निवडणूक लढवली.यामध्ये मतदारराजाने दिलेला कौल मान्य असून विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याध्यामतून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहू, असे स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलचे महारुद्र पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT