मंचर (जि. पुणे) : राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी व्हावेत; म्हणून मी चप्पल न घालता अनवाणी फिरून प्रचार केला. ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. वळसे पाटील हे माझे दैवत आहेत, अशी प्रतिक्रिया मंचर बाजार समिती निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देवदत्त निकम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) संधी दिली लोकसभेची निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Walse Patil is my god; NCP will contest Lok Sabha if given a chance : Devdutt Nikam)
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी डावलल्यानंतरही माजी सभापती देवदत्त निकम हे बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. विजयानंतर ते भावूक झाले होते. अनेकदा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
माजी सभापती निकम म्हणाले की, विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीमध्ये वळसे पाटील विजयी झाल्यानतर मी घातलेली चप्पल काही दिवस वापरली. नंतर ती चप्पल तशीच घरात ठेवून दिली होती. आज निवडणूक मतमोजणीसाठी येताना वळसे पाटील यांच्या प्रतिमेला नमस्कार केला. त्यानंतर तीच चप्पल घालूनच मी मतमोजणी केंद्रात आलो. वळसे पाटील यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वळसे पाटील यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे.
यापुढे तुमची वाटचाल काय असेल? या प्रश्नावर देवदत्त निकम म्हणाले की, आगामी लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्यास माझी तयारी राहील. वेळ येईल त्यावेळी आणखी स्पष्टपणे बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.