Bazar Samiti Result : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात ७५ वर्षांत प्रथमच विरोधकाचा प्रवेश : सत्ता कायम मात्र उत्तम जानकर विजयी

जानकर यांचा विजय हा मोहिते पाटील गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
Mohite Patil-Uttam Jankar
Mohite Patil-Uttam JankarSarkarnama

सुनील राऊत/शशिकांत कडबाने

अकलूज (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील अकलूज (Akluj) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) पंचवार्षिक निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील पॅनेलने (Mohite Patil) अपेक्षप्रमाणे बाजी मारली आहे. मात्र, तालुक्याच्या राजकारणाच्या इतिहासात बाजार समितीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांच्या रुपाने विरोधकाचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे जानकर यांचा विजय हा मोहिते पाटील गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांच्याकडून म्हणावा तसा जल्लोषही साजरा करण्यात आलेला नाही. (Mohite Patil group continues to rule in Akluj Bazar Samiti)

अकलूज बाजार समितीच्या निवडणुकीत मोहिते पाटील पॅनेलला १८ पैकी १७ जागा मिळाल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती मतदारसंघातून उत्तम जानकर हे निवडून आले आहेत. त्यांना ६७८ मते मिळाली आहेत. विशेषतः सत्ताधारी गटाकडून फेरमतमोजणीची मागणीही त्यांच्यासंदर्भात करण्यात आली होती. त्यानंतरही जानकर यांची मते कायम राहिली आहेत. बाजार समितीच्या निकालामुळे व त्यातील मतांची आकडेवारी पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोहिते पाटलांना सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण, विधानसभेच्या निवडणुकीतही जानकर यांचा केवळ २५०० मतांनी पराभव झाला होता.

Mohite Patil-Uttam Jankar
Bazar Samiti Result : पुण्यात अजितदादांना धक्का : बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागांवर सर्वपक्षीयांचा विजय

या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील पॅनलचे मदनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह १७ तर माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीचे उत्तम जानकर विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघामधील सर्वसाधारण गटातील सात, महिला राखीवच्या दोन, विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय मतदार संघ प्रत्येकी एक जागा अशा सहकारी संस्था मतदार संघातील एकूण ११ जागांपैकी ११ जागांवर, ग्रामपंचायत मतदार संघाच्या तीन, व्यापारी मतदार संघाचे दोन व हमाल तोलार मतदार संघाचा एक असे एकूण १७ जागांवर विजय मिळवित विजयसिंह मोहिते पाटील पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले.

माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीने ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाच्या एका जागेवर विजय मिळविला आहे. सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटाचे विजयी उमेदवार : मदनसिंह मोहिते-पाटील (१०४३), मारुतराव रुपनवर (१००९), शिवाजी चव्हाण (१०१६), नितीन सावंत (९९५), बाबुराव कदम (१०२०), बाळासो माने देशमुख (१०१७), लक्ष्मण पवार‌ (१००३).पराभूत उमेदवार : नागेश काकडे (६३६), उत्तम जानकर (६७८), बाळासाहेब सावंत (६०८), गणेश इंगळे (६३६), पांडुरंग पिसे (६३३), पांडुरंग वाघमोडे (६३३), दादासाहेब लाटे (६२०).

Mohite Patil-Uttam Jankar
Bazar Samiti Result : सावंतांना माढ्यात पराभवाचा धक्का : राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंची १८ जागा जिंकत विजयी घौडदौड कायम

महिला राखिव मतदार संघामध्ये मेघा साळुंखे (१०४५), अमृता सुरवसे (१०२०) यांचा विजय झाला असून पद्मजादेवी मोहिते-पाटील (६९९), सोनाली पाटील (६७८), यांचा पराभव झाला आहे. इतर मागासवर्गीय मतदार संघातून भानुदास राऊत (१०६०) हे विजयी झाले आहेत तर भीमराव फुले (६८२) यांचा पराभव झाला आहे. सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती गटातील संदीप पाटील (१०७६) हे विजयी झाले आहेत तर अजित बोरकर (६६१) यांचा पराभव झाला आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटामध्ये बापूराव पांढरे (५४८), शहाजीराव देशमुख (५९५) हे दोघे विजयी झाले असून पदमजादेवी मोहिते-पाटील (४६१), केशवराव पाटील (४८१) यांचा पराभव झाला आहे. अनुसुचित जाती जमाती गटामध्ये उत्तम जानकर (५५४) यांचा विजय तर दत्तूराम लोखंडे (५२४) यांचा पराभव झाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये पोपट भोसले (५८५) यांचा विजय तर यशवंतराव घाडगे (४९०) यांचा पराभव झाला आहे.

Mohite Patil-Uttam Jankar
Bazar Samiti Result : मंचरमध्ये वळसे पाटलांना दे धक्का : राष्ट्रवादीचे बंडखोर निकम विजयी, सत्ता मात्र महाविकास आघाडीची

व्यापारी मतदार संघामध्ये आनंदा फडे (३१५), महावीर गांधी (३१९) हे दोघे विजयी तर मोहसीन बागवान (१९), दिपक गरड (९२) हे पराभूत झाले आहेत. हमाल तोलार मतदार संघामध्ये उध्दव डांगरे (१४४) हे विजयी तर संजय कोळेकर (०५) हे पराभूत झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या मतमोजणीवर हरकती घेतल्याने या मतदारसंघाची फेरमतमोजणी केली गेली, त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com