Tanisha Bhise Death Case : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 10 लाख डिपाॅझिट मागितले तसेच उपचार केले नाही म्हणून तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. धर्मादायच्या नियमानुसार भिसे कुटुंबीयांकडे पिवळे रेशनकार्ड होते तरी देखील त्यांना उपचार नाकारण्यात आल्याचे सांगितले जाते.
मात्र, तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे आमदाराचे पीए आहेत. त्यांच्याकडे पिवळे रेशनकार्ड कसे आहे? त्यांचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी कसे असू शकते? यावरून सोशल मीडियावर भिसे कुटुंबीयांना ट्रोल करण्यात येत आहे.
पिवळे रेशनकार्ड आणि उत्पन्नावरून होणाऱ्या टीकेवरून भिसे कुटुंबीयांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. भिसे कुटुंबीयांनी आपले रेशनकार्ड दाखवत सांगितले की आमदाराच्या पीएला 30 हजारापेक्षा कमी मानधन असते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पीएचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा देखील कमी असते. आमदाराचा पीए असला तरी माणसाकडे येवढे पैसे नसतात. आम्ही तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती. आमदार अमित गोरखे हे सात लाख रुपयांची व्यवस्था करत होते.
पिवळे रेशनकार्ड आणि उत्पन्नावरून होणाऱ्या टीकेवरून भिसे कुटुंबीयांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. भिसे कुटुंबीयांनी आपले रेशनकार्ड दाखवत सांगितले की आमदाराच्या पीएला 30 हजारापेक्षा कमी मानधन असते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पीएचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा देखील कमी असते. आमदाराचा पीए असला तरी माणसाकडे येवढे पैसे नसतात. आम्ही तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती. आमदार अमित गोरखे हे सात लाख रुपयांची व्यवस्था करत होते.
भिसे कुटुंबीयांनी आरोप केला की, त्यांचे मिडिया ट्रायल सुरू आहे. त्यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले जात आहे. मानसिक त्रास दिला जातो आहे. आम्ही तनिषाला न्याय मिळावायासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. दोन मुली अनाथ झाल्या आहेत. दोन चौकशी अहवाल देखील समोर आले आहेत त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून चौकशी करण्यात आली. तसेच धर्मादाय आयुक्तांकडून देखील चौकशी करण्यात आली. हे दोनही अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत. दरम्यान, ससूनचा अहवाल अजून आलेला नाही.
ससूनच्या अहवालानंतर रुग्णालयावर काय कारवाई होणार हे स्पष्ट होईल. दरम्यान, ससूनच्या अहवालाला काही काळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशी समितीला दोन तीन रुग्णालयाची कागदपत्रे तपासायची आहेत. तसेच तज्ज्ञांची मते घ्यायची आहेत त्यामुळे अहवालाला उशीर लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
अंतर्गत अहवालाच्या नावावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने तनिषा भिसे हिची खासगी माहिती सार्वजनिक केली, असा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी भिसे कुटुंबीयांकडून अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली आहे. तसेच चौकशी समितीमधील सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.