Political leaders and party workers in Bhor prepare for the upcoming municipal election after the mayor post opens, signaling major political changes. Sarkarnama
पुणे

Bhor Municipal Election : भोर नगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण! इच्छुक उमेदवारांच्या पक्ष बदलाच्या हालचालींना वेग

Bhor Political Equations : भोर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे खुले झाले असल्यामुळे आगामी निवडणूकीसाठी शहरातील सर्वच इच्छूक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. शिवाय नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गात असल्यामुळे इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Jagdish Patil

Bhor Municipal Election 2025 : भोर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे खुले झाले असल्यामुळे आगामी निवडणूकीसाठी शहरातील सर्वच इच्छूक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. शिवाय नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गात असल्यामुळे इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्यामुळे आगामी निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची आणि राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची असणार यात वादच नाही.

माजी आमदार संग्राम थोपटेंनी काँग्रेसमध्ये असताना मागील पंचवर्षीक निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा मिळवून नगरपालिकवर एकहाती सत्ता आणली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच मुख्य लढत झाली होती. मात्र, आता तेच संग्राम थोपटे हे भाजपामध्ये गेलेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन गटांमध्ये विभागली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.

तर सध्या संग्राम थोपटेंच्या मार्गदर्शनाखाली भाजप तर विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांमध्ये लढत होणार आहे. यासह नव्याने निर्माण झालेली 'भोर विकास परिवर्तन आघाडी' आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे गट यांचाही सहभाग निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे इच्छूकांच्या फेऱ्या वाढल्या असून आपल्या उमेदवाराला पक्षाचे तिकीट मिळावे असाही आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला जात आहे. त्यामुळे आता तिकीट मिळविण्यासाठी राजकीय पक्षांमधील अंतर्गत धुसफूस बाहेर येऊ शकते.

नगराध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे व गणेश पवार, माजी नगरसेवक यशवंत डाळ, संजय जगताप व जगदीश किरवे या माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासह काही नवे चेहेरेही दिसण्याची शक्यता आहे.

त्यामुळे एकंदरीत भोर मतदारसंघात बदलाचे वारे सुरु झाल्यामुळे ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे वाद मिटवत बसण्यापेक्षा नगरपालिकेच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभागरचनेत झालेला बदल आणि सदस्यांच्या संख्येतील वाढ पहाता 20 सदस्य असलेल्या नगरपालिकेत किमान 5-6 नवीन चेहरे दिसू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT