Sangola Politics : सांगोल्यात भाजपकडूनच शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव? शहाजीबापूंच्या विरोधकाला विजयी करण्यासाठी मदत केल्याचं जयकुमार गोरेंचं वक्तव्य

BJP vs Shinde Sena : विधानसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांच्या विरोधात काम करून शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणल्याची जाहीर कबुली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
Jaykumar Gore, Shahajibapu Patil
Guardian Minister Jaykumar Gore addressing supporters in Sangola, where he admitted aiding Babasaheb Deshmukh’s 2019 victory a remark fueling BJP–Shinde Sena political tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News, 12 Oct : विधानसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांच्या विरोधात काम करून शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणल्याची जाहीर कबुली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काही समर्थकांनी भाजप प्रवेश केला. मात्र हा पक्षप्रवेश होऊ नये यासाठी आमदार देशमुखांनी प्रयत्न केल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं.

यावर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, 'काही लोकं म्हणतात मी किती दिवस पालकमंत्री असेल, पण तुम्हाला आमदार करताना मी पालकमंत्री नव्हतो.' असं म्हणत त्यांनी देशमुखांना आमदारकीसाठी मदत केल्याची कबुली दिली.

Jaykumar Gore, Shahajibapu Patil
Sangram Jagtap Hindutva issue : अजितदादांनी आपल्या शिलेदाराला फटकारताच, भाजप मंत्री मैदानात; गुन्हा दाखल होऊनही संग्राम जगताप बीडची सभा गाजवणार?

गोरे म्हणाले, 'तुम्ही आमदार होताना जयकुमार गोरे यांनी मदत केली म्हणून तुम्ही आमदार झाला तेव्हा मी पालकमंत्री नव्हतो. आमदार होताना माझी मदत चालली', असं म्हणत गोरेंनी भाजपने देशमुख यांचं काम केल्याची कबुली दिली. शिवाय 2029 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचा आमदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Jaykumar Gore, Shahajibapu Patil
Nashik Crime : धक्कादायक! आरपीआय नेत्याच्या कार्यालयात आढळलं चक्क भुयार, अनेक वर्षांपासून गुन्हेगारीसाठी वापर!

मात्र, देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपनेच बापूंचा गेम केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, पालकमंत्री गोरेंच्या वक्तव्यावर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शहाजीबापू पाटील म्हणाले, 'निवडणुकीत मला भाजपने मदतच केली चुकून भावनेच्या भरात पालकमंत्री बोलून गेले असतील. शिवाय निवडणुकीत झालेला पराभव हा माझ्या आजारपणामुळे झाला. मात्र 2029 मध्ये सांगोल्यातून शिवसेनेचाच आमदार होईल आणि सांगोल्याची जागा शिवसेनेकडेच राहील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com