Ajit Pawar, Sangram Thopte, devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Bhor Election Result : संग्राम थोपटेंना धक्का; मुख्यमंत्र्यांना निवडणूक रिंगणात उतरूनही अजितदादांच्या आमदारांनी मारली बाजी

Sangram Thopte setback : भोर नगरपालिकेमध्ये भाजपचे जगदीश किरवे, मयुरी गायकवाड, जयवंत शेटे, रेणुका बदक विजय झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल बेलके, सुरेखा मळेकर, कुणाल धुमाळ विजय झाले आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : भोर नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या प्रचारात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उतरल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांनी मोठ्या जंगी सभा भोरमध्ये घेतल्या होत्या. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले रामचंद्र आवारे हे 170 मतांनी विजयी झाले आहेत.

भोर हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा गड राहिला आहे. गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी थोपटे कुटुंबामध्ये आमदारकी होती. गेली पंधरा वर्षे संग्राम थोपटे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येत होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार असलेले शंकर मांडेकर यांनी थोपटे यांचा पराभव केला.

पराभवानंतर संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देखील संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यातील संघर्ष कायम असल्याचं पाहायला मिळालं आणि हा संघर्ष नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने समोर आला होता. शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून काँग्रेसमध्ये असलेल्या आवारे यांना ऐन निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली.

दुसरीकडे थोपटे यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या दोन्ही नेत्यांनी मोठी ताकद या निवडणुकीमध्ये उतरवली. त्यामुळे ही निवडणूक अतितटीची झाली आणि अखेर अजित पवारांच्या उमेदवारांनी थोपटे यांनी दिलेल्या उमेदवाराचा 170 मतांनी पराभव केला आहे.

भोर नगरपालिकेमध्ये भाजपचे जगदीश किरवे, मयुरी गायकवाड, जयवंत शेटे, रेणुका बदक विजय झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल बेलके, सुरेखा मळेकर, कुणाल धुमाळ विजय झाले आहेत तर जयश्री शिंदे आणि आशु ढवळे यांना एकसमान मते मिळाली आहेत. हा संग्राम थोपटे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT