

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निकालात यंदा अभिजीत बिचुकलेंचा पराभवा झाला असला तरी त्यांनी चौथ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत. त्यांना या निवडणुकीत 2772 मतं पडली. अपक्षांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निकालानंतर विरोधी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.ते म्हणाले, या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार आहे,हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं. त्यामुळे ते बाहेरच पडले नाही किंवा कमी पडले. आता हरल्याचं लोकांना कळलं तर महापालिका आणि जिल्हा परिषदेत कार्यकर्त्याचं मोरल डाऊन होईल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपासह महायुतीनं मोठा विजय मिळवला आहे. अशातच मीरा भाईंदरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागप्रमुख श्रीजीत मोहन यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासह 70 कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतलं आहे.
राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रचंड यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा अत्यंत आभारी आहे. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचे आहे, हा त्यांचा विजय आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मा. जे.पी. नड्डाजी आणि कार्यकारी अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले. आतापर्यंत (दुपारी 3) जे कल/निकाल आले, त्यात 2017 च्या 94 च्या तुलनेत यंदा आम्ही 129 नगरपालिकांवर (45 टक्के) यश संपादन केले. महायुती म्हणून 215 नगरपालिका (74.65 टक्के) आम्ही जिंकल्या आहेत. (एकूण नगरपालिका : 288)
मुदखेड नगरपरिषद निवडणुकीत यंदा तब्बल वीस वर्षानंतर भाजपचे कमळ फुलले आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर कायम काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुदखेड नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस पक्षाचा इथे दारुण पराभव झाला आहे. मुदखेड नगरपरिषदेवर गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेसची पकड होती.
हा वियज टीम भाजपचा. कोणावरही टीका न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर विजय. भाजपचं नंबर वन हे पुन्हा एकदा सिद्ध. महाराष्ट्रातील जनतेमधील भाजप आणि एनडीएविषयी सकारात्मकतेचा फायदा. राज्यात भाजप हाच पहिल्या क्रमांकावर.
शिंदे शिवसेना - 8
भाजप - 2
अजित पवार राष्ट्रवादी - 6
ठाकरे सेना - 1
काँग्रेस - 1
अपक्ष - 2
एकूण नगरसेवक - 20+नगराध्यक्ष
मंचर नगरपंचायत :अंतिम निकाल
नगराध्यक्ष : राजश्री गांजाळे - शिंदे शिवसेना
नगरसेवक पक्षीय बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी - 09
शिंदे शिवसेना - 03
ठाकरे शिवसेना - 01
शरद पवार राष्ट्रवादी - 01
अपक्ष - 03
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्या तुलनेत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. महाविकास आघाडीत फक्त काँग्रेसलाच दोन अंकी संख्या ओलांडता आली आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. कुणाची बहीण निवडणुकीत उभी होती, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाची भावजय तर कुणाचा जवळचा कार्यकर्ता. त्यामुळे प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्याने या निवडणुकीत स्वत: लक्ष घातलं होतं. प्रचारात जीवाचं रान केलं होतं. यात काहींना यश आलं. तर काहींच्या पदरी निराशा आली आहे. या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंपासून ते राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. तर प्रफुल्ल पटेल यांनाही होम पिचवर मोठा धक्का बसला आहे.
नगराध्यक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या विजयी उमेदवार श्रीमती मनीषा गोरे
1) शिवसेना (एकनाथ शिंदे) =13
2) राष्ट्रवादी (अजित पवार) =10
3) उबाठा=01
4) अपक्ष=01
अकलूज नगरपरिषदेतील 13 प्रभागांमध्ये 26 उमेदवार आहेत. त्यामधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 22 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्मा आडगळे 2793 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या पूजा कोथमीरे यांचा पराभव झालेला आहे.
निलंगा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे संजय हलगर्कर 2026 मतांनी विजयी झाले आहेत. नगरसेवकाच्या 23 जागापैकी 15 भारतीय जनता पक्ष तर 08 नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले आहेत.
शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उमेदवार विद्या भुषण कावसानकर 3665 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांची थेट लढत उबाठाचे दत्ता गोर्डे यांच्या पत्नी अपर्णा गोर्डे यांच्यासोबत होती..
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अजित पवारांनी सभा घेत आव्हान दिले होते. पण बोर्डीकर यांनी जिंतूरमध्ये आपली ताकद सिद्ध केली.. सहा पैकी जिल्ह्यात तीन नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा अवघ्या 120 मतांनी विजयी..
प्रदीप गारटकर अवघ्या 120 मतानी पराभूत..
इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना मोठा धक्का..
पाचवी फेरी अखेेर
राष्ट्रवादी 21 भाजप 09, काँग्रेस 5, एमआयएम 02 शिवसेना 00
नगराध्यक्ष पदासाठी भाजपाची आघाडी
इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कृष्णा भीमा विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे भरत शहा विजयी आहेत. इंदापुरात प्रदीप गारटकारांचा पराभव झाला असून इंदापुरात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते प्रवीण माने यांना धक्का बसला आहे.
सावंतवाडी : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले विजयी; भाजपचे 11, शिवसेना शिंदे गट 7, उद्धव ठाकरे शिवसेना 1 तर काँग्रेसचे 1 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी
फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना धक्का देत ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. खुलताबादमध्ये काँग्रेसने खाते उघडले आहे. फुलंब्रीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेंद्र राठोड विजयी. १८४८ मतांनी भाजपच्या सुहास शिरसाट यांचा केला पराभव. नगर परिषदेत सत्ताही महाविकास आघाडीची येणार हे निश्चित..
जेजुरी नगर परिषद
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी
भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी
तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी.
२० पैकी १२ उमेदवार काँग्रेसचे निवडणूक आले आहेत. ८ ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. काँग्रेसचे नगराध्यक्ष शेख अब्दुल ४३१ मतांनी विजयी झाले आहेत.
जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाई सारिका अरविंद माने या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा दारुण पराभव तसेच त्यांची सुपुत्र अरविंद अशोकराव माने यांचा नगरसेवक पदाकरता दारुण पराभव
जितू ठाकूर : 6001
डॉ. परिक्षित बाविस्कर : 5531
जितू ठाकूर : 530 मतांनी आघाडी
भाजप- ६
काँग्रेस- १
शिंदे शिवसेना- 1
उबाठा सेना- 1
पाच फेऱ्या पूर्ण
भाजपच्या श्रद्धा भोसले 900 मतांनी आघाडीवर
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत आतापर्यंत जाहीर दहा निकालांमध्ये भाजपचे 6 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले. यात सुधीर आडिवरेकर, दुलारी रांगणेकर, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर यांचा समावेश आहे.
तिसरी फेरी
राष्ट्रवादी १७
भाजप ०२, काँग्रेस २, एमआयएम ०२ शिवसेना ००
नगराध्यक्ष पदासाठी भाजपाची आघाडी
पुसद नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी मोहिनी इंद्रनील नाईक मतमोजणीत आघाडीवर आहेेत.
सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे उमेदवार विजयी झाल्या आहेत.
औसामध्ये भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार विजयी झाले आहे.
कराड नगरपालिकेच्या मतमोजणीत पहिली फेरी पूर्ण झाली असून त्यामध्ये यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार राजेंद्रसिंग यादव हे आघाडीवर आहेत
रत्नागिरी
प्रभाग 12 मधील शिवसेनेच्या उमेदवार जागृती पिळणकर आणि राकेश नागवेकर यांचा पहिला निकाल जाहीर झाला असून ते विजयी झाले आहेत
पहिली फेरी
राष्ट्रवादी ०८
भाजप ००, काँग्रेस ००, एमआयएम ०० शिवसेना ००
नगराध्यक्ष पदासाठी भाजप आघाडीवर
पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे सागर हिरे 1619 मतांनी आघाडीवर
राजेश बनकर : 1817
सागर हिरे : 3436
सासवड नगरपालिका
24 सदस्य संख्या आणि 1 नगराध्यक्ष आहे
22 उमेदवारांसाठी मतमोजणी आहेत.
2 बिनविरोध झाले आहेत.
भाजपच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार जगताप या आघाडीवर
भोरमध्ये भाजपची आघाडी, उमेदवारांकडून गुलाल उधळणीला सुरुवात
इंदापूर मध्ये सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार असलेले प्रदीप कंद पिछाडी वर
अजित पवारांच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आघाडीवर
मालवण नगरपालिका निवडणूक निकाल
पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर
पूजा करलकर 689
शिल्पा खोत - 809
ममता वराडकर 981
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आघाडीवर आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी कथले 832 मतांनी पुढे आहेत.
कुरुंदवाड नगरपालिकेत यड्रावकर गटाच्या मनीषा डांगे पहिल्या फेरीत 1184 मतांनी आघाडीवर आहेत. शिरोळ नगराध्यक्ष योगिता कांबळे २१५९ मताने आघाडीवर आहे
मलकापूरचे माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे पराभूत .पहिल्या फेरीत जनसुराज्याच्या रश्मी कोठावळे ४४ मतांनी आघाडीवर
नंदुरबार नगरपालिकेसाठी 11 फेऱ्या, शहादा नगरपालिकेसाठी 5 फेऱ्या नवापूर नगरपालिकेसाठी 6 फेऱ्या आणि तळोदा नगरपालिकेसाठी 7 फेऱ्या होणार आहेत..
Murgood Nagar palika election result LIVE:मुश्रीफ गटाला धक्का बसला
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड नगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला आहे. मुरगूड मध्ये मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. पहिल्या फेरीत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या शिवसेना भाजपचे ४ चार उमेदवार आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगर सिल्लोडमध्ये शिवसेनेचे समीर अब्दुल सत्तार पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत.
कागलमध्ये निवडणुकीपूर्वी अभिनंदनाचे बॅनर झळकले असून निवडणूक निकालापूर्वी लावलेल्या बॅनरवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.निवडणुक आयोगाने बॅनर लावणारांना आधीच निकाल सांगितला आहे का? असा एका उमेदवारांकडून सवाल करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे का असा सवाल करत, पोलीस प्रशासनानं या बॅनरवर कारवाई कारवाई करायला हवी, अशी मागणी उमेदवारांकडून मागणी केली जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील जनतेचं ज्या निकालाकडे डोळे लागले होते अखेर तो क्षण आता आला असून राज्यभरातील २८८ नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे असं सांगत एक व्यक्ती स्ट्राँग रुमच्या दिशेने गेल्याने ईश्वरपूर नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झाला आहे. सदर व्यक्ती स्ट्राँग रुमच्या दिशे जाण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना हा व्यक्ती स्ट्राँग रुमकडे गेला कसा? असा सवाल मविआच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी उपस्थित केला आहे.
फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मतमोजणीदरम्यान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने फुरसुंगी आणि उरुळी देवाची परिसरातही जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
भोर नगरपरिषदेची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. 9 वाजून 30 मिनिटांनी स्ट्रॉंग रूम खोलले जाणार आहेत. तर सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 5 टेबलवर 5 फेऱ्या मतमोजणी होणार यापैकी एक टेबल हा टपाली मतदान मोजणीसाठी असणार आहे.
सोलापुरात भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित होणार, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.
नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या मजमोजणीला अद्याप सुरूवात झाली नाही. मात्र, याआधीच अक्कलकोटमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी आणि बॅनरबाजी करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकांची आज मतमोजणी असून यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, आंबेजोगाई, परळी नगर परिषदांचे निकाल जाहीर होणार आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 400 अंमलदार आरसीबी आरसीएफ पोलिसांचा मोठा फौज फाटा तैणात करण्यात आला.
निकालाआधीच मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषित करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून याबाबतचं राज्य निवडणूक आयोगाचं पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना आलं आहे. त्यानुसार आज सकाळी जिल्हाधिकारी अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याची घोषणा करणार आहेत. तर या नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि १७ सदस्यपदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे.
काँग्रेसला 75, ठाकरे सेनेला 5 तर शरद पवार गटाला एक जागा? काँग्रेसकडून घटक पक्षांसोबत केवळ जिंकून येणाऱ्या जागांवरच चर्चा. महाविकास आघाडीच्या समितीच्या बैठकीत काँग्रेसकडून घटक पक्षांना प्रस्ताव कोल्हापुरात ठाकरे सेनेला केवळ पाच जागांवर मानावे लागणार समाधान? तर शरद पवार गटाला केवळ एकच जागा, महाविकास आघाडीच्या या फॉर्म्युल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता.
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि न्यायालयाच्या आदेशांनंतर घेण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. एकीकडे राज्यरातील निकालाची प्रतिक्षा असताना निकालापूर्वीच तीन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्षपदी तर भाजपचे नयनकुंवर रावल दोंडाईचा नगराध्यपदी आणि बहुचर्चित अनगरच्या नगराध्यक्षपदी भापच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर सर्वांना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो निकालाचा अखेर आज आला आहे. राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी थोड्या वेळात सुरू होणार असून दुपारपर्यंत सर्व निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तब्बल 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक अखेर पार पडली. 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर अशा 2 टप्प्यांत या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर आज (21 डिसेंबर) रोजी मतमोजणी होणार आहे. यात आता कोण बाजी मारणार? कोण गुलाल उधळणार? आणि कोणाच्या पदरी पराभव येणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.