Ausa Nagar Parishad election Result : CM फडणवीसांच्या मर्जीतील आमदाराला मोठा धक्का; राष्ट्रवादीने चारली धूळ...

Abhimanyu Pawar BJP : निवडणुकीसाठी अभिमन्यू पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आमदार झाल्यापासून नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
devendra Fadnavis, Ajit Pawar
devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का बसला आहे. लातूर जिल्हातील महत्वाची नगरसेवक मानल्या जाणाऱ्या औसामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे. आजी-माजी आमदार पक्षात असूनही भाजपला नगरपरिषदेत कमळ फुलविता आले नाही.

औसा नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासह २३ जागांसाठी मतदान झाले होते. अभिमन्यू पवार हे २०१९ पासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. तर त्याआधीच्या दोन टर्म बसवराज पाटील हे आमदार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे औसामध्ये भाजपची ताकद वाढली होती.

भाजपसमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आव्हान होते. मात्र, आजच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने पुन्हा एकहाती सत्ता काबीज करत गड राखला. नगराध्यक्षपदासह राष्ट्रवादीचे १७ उमेदवार विजयी झाले आहे. पवार आणि पाटील यांची जोडी भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही. भाजपच्या पारड्यात केवळ सहा जागा पडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन नवाबोद्दीन शेख विजयी झाल्या आहेत. स्वत: अजित पवार यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली होती.

devendra Fadnavis, Ajit Pawar
Nagar Palika Nivdnuk Nikal Live: जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोकराव माने यांचे सुपुत्र अन् सुनबाई पराभूत

मागील निवडणुकीतही राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. भाजपला मागच्या निवडणुकीतील सहा जागांचा आकडा यावेळी पार करता आलेला नाही. अभिमन्यू पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आमदार झाल्यापासून नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

devendra Fadnavis, Ajit Pawar
Kishori Pednekar : 'आमदार पैशांच्या पेट्या घेऊन बसलेत, आजचा निकाल हा केवळ जय-पराजयाचा नसून तो निष्ठेचा की खोक्यांचा हे ठरवणारा...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले होते. यामध्ये अजित पवार वरचढ ठरले आहेत. नगरपरिषदेत पुन्हा राष्ट्रवादी झेंडा फडकवत अजित पवारांनी मराठवाड्यातील आपली ताकद कमी झालेली नाही, असा संदेश यानिमित्ताने दिला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com