Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

MP announcement change: भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांचा वेग पुन्हा वाढणार; टिकेनंतर खासदारांनी जाहीर केलेल्या निर्णयात फेरबदल

Navale Bridge speed limit News : खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये भुमकर ब्रिज ते नवले पुला दरम्यान वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता.

Sudesh Mitkar

Pune News : काही दिवसांपूर्वी नवले ब्रिज परिसरामध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातामध्ये अनेकांना आपले जीव गमवावा लागला. यानंतर राज्यस्तरावर नवले ब्रिज परिसरातील होणारे अपघात रोखण्यासाठी बैठक घेण्यात आली. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये भुमकर ब्रिज ते नवले पुला दरम्यान वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता त्या निर्णयात फेरबदल करण्यात आला आहे.

कात्रज बायपास मार्गावर नवले पूल परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. नवीन कात्रज बोगदा परिसरातील घाट उतारावर माल वाहतूक करणारी वाहन न्यूट्रल करून गाड्या चालवताना पाहायला मिळतात. त्यामुळे अशा परिस्थितीत गाडीवरच कंट्रोल सुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये उपाययोजना करण्यात आले आहेत, तरी देखील अपघाताचे प्रमाण काही कमी झालेले नाही.

गेल्या महिन्यात झालेल्या अपघातानंतर केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाने बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये विविध उपाय योजना संदर्भात निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी नवले ब्रिज परिसरामध्ये वाहनांच्या वेग मर्यादेबाबत घोषणा केली होती.

त्यांच्या या घोषणेनंतर शासनाने या परिसरामध्ये 30 किलोमीटर वेग मर्यादा करण्याचा निर्णय देखील घेतला. मात्र, उतारा वर 30 किलोमीटरचा वेग मर्यादित ठेवणं आणि वाहनांना शक्य होत नव्हते. त्यामुळे कोट्यावधींचा दंड वाहन चालकांना सहन करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर त्यासोबतच विविध माध्यमांमध्ये या निर्णयावर जोरदार टीका होत होती. या होणाऱ्या टिकेनंतर आता खासदारांनी जाहीर केलेल्या निर्णयात प्रशासनाकडून फेरबदल करण्यात आला आहे.

पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक असल्याने मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1)(2)(बी), 116 (4) व 117 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा (अत्यावश्यक सेवेतील वाहने–अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका इ. वगळता) 40 किमी प्रतितास करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

हे आदेश 4 डिसेंबर 2025 पासून लागू राहणार आहेत. या मार्गावर यापूर्वी वेगमर्यादेबाबत निर्गमित केलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासावेत, रस्त्यावरील बोर्डिंग व चिन्हांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे. या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT