Pune BJP Politics : तब्बल 1 हजार इच्छुक, 21 जण प्रतीक्षेत; भाजप एक घाव दोन तुकडे करणार; पुण्यासाठी मेगा प्लॅन!

PMC Election BJP : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा दिसून येते आहे. निवडणूक लढण्यासाठी एक जागेसाठी चार इच्छुक भाजपमध्ये आहेत.
Pune BJP Politics News
Pune BJP Politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून इच्छुकांचे अर्ज मागवले जात आहेत. मात्र, भाजपकडून अद्यापही इच्छुकांचे अर्ज मागवण्याच्या प्रक्रिये बाबत कोणत्याही हालचाल नाही. त्यामुळे पक्ष निवडणुकीची प्रक्रिया कधी सुरू करणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अशात आता पक्षाच्या वरिष्ठांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या रणनिती, उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेसाठी तारीख निश्चित केली आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडे इच्छुकांची संख्या देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये चार जागांसाठी तब्बल वीस जण इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे .त्यासोबतच पक्षांमध्ये इन्कमिंग करण्यासाठी ही मोठी लाईन भाजपकडे असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आणि पूर्ण तयारी केलेल्यांची संख्या तब्बल 1 हजार इतकी आहे.

भाजपमध्ये निवडणुकी लढण्याच्या तयारी असलेल्यांची संख्या एक हजारवर असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्याती मोठे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक असे 21 जण भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून त्यांना देखील उमेदवारी हवी आहे. इन्कमिंगसाठी वेटिंगवर असलेले हे नेते देखील त्रस्त झाले असून एकदाच काही तो निर्णय घेऊन टाका, असा तगादा त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे लावत आहेत.

Pune BJP Politics News
Shivsena UBT vs BJP : 'मोदी काळात भारत गोमांस निर्यात करणारा महत्त्वाचा देश बनला, संघ-भाजप मंदिरे तोडत आहेत आणि भक्त 'नमो नमो'च्या नकली हिंदुत्वात गुंग झालेत...'

या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील भाजपच्या कोर कमिटीची बैठक येत्या रविवारी (ता.7) होणार असल्याचे सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये इनकमिंगसाठी वेटिंगवर असलेल्या नेत्यांबाबत फायनल निर्णय घेण्यात येणार आहे. सोबतच आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया बाबत देखील निर्णय घेण्यात येणार आहे.

15 डिसेंबरनंतर अर्ज मागवणार?

रविवारी ही बैठक झाल्यानंतर 15 डिसेंबरनंतर भाजपकडून इच्छुकांचे अर्ज मागवण्याची सुरुवात करण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाजप उमेदवार निश्चितीचा कार्यक्रम करणार आहे. त्यामुळे या कोर कमिटीच्या बैठकीकडे पुण्यातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

बैठक पुढे जाण्याची शक्यता...

येत्या रविवारी ही बैठक होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी पुढील आठवड्यात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह बहुतांश कोर कमिटीचे मेंबर हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे जाण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर कोर कमिटीमध्ये असलेले खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक होणार का ?याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून याबाबतचा निर्णय आणि इच्छुकांचे अर्ज मागवण्याची तारीख देखील पुढे ढकलण्यात जाण्याची शक्यता आहे.

Pune BJP Politics News
Koregaon Bhima Case : उद्धव ठाकरेंची अटक टळली, वाॅरंट रद्द; प्रकाश आंबेडकरांच्या पत्रानंतर मोठ्या घडामोडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com