Chinchwad By-Election :  Sarkarnama
पुणे

Chinchwad By-Election : ठाकरे गटाची मोठी कारवाई : आठ पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी!

सरकारनामा ब्यूरो

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. येथे २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडत आहे. प्रचाराचा आता अंतिम आठवडा राहिला असून, उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मात्र या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडून आली आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना प्रचारात साहाय्य केल्याने ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे नाना काटे यांना उमेदवारी बहाल केली आहे. मात्र ठाकरे गटाशी बंड करत राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. यामुळे इथे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. यातच आता जुन्या मैत्रीखातर ठाकरे गटाचे काही शिवसैनिक प्रचारात मदत केली होती. यामुळे आता ठाकरे गटाने या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाकरे गटाच्या आदेशा विपरीत काम केल्याचा ठपका महिला संघटिका अनिता तुतारे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तुतारे यांच्यासह इतर आठ जणांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात आदित्य ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल फर्फ नाना काटेंच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये रोड शो करणार आहेत. या रोड शो आधीच या कारवाईचे वृत्त आता समोर आले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड ठाकरे गट शहराध्यक्ष सचिन भोसले मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. पक्षाविरोधी कारवायांमध्ये कोण कोण सहभागी आहेत. याबाबत त्यांनी ठाकरेंना कळवले होते. यानंतर उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर सचिन भोसले आणि गौतम चाबुकस्वार यांनी या कारवाईचा बडगा उगारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT