Rohit Pawar- Yuva Sangharsha Yatra Sarkarnama
पुणे

Rohit Pawar News : मोठी बातमी ! आमदार रोहित पवारांनी 'युवा संघर्ष यात्रा' अचानक थांबवली; 'हे' आहे कारण

Deepak Kulkarni

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवा नेते आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला 24 ऑक्टोबरला सुरुवात केली होती. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती. युवावर्गाला भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर, अशी आठशे किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा 24 ऑक्टोबरपासून 42 दिवस पायी काढली हाेती.

पण एकीकडे ही यात्रा सुरू असतानाच मराठा आरक्षणावरून संघटना आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी नेतेमंडळींच्या गाड्या अडवल्या जात आहेत, तर काही गावात आमदार, खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा थांबवत असल्याची मोठी घोषणा केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार रोहित पवार यांनी शिरूर तालुक्यात शुक्रवारी मीडियाशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पुण्यापासून ते नागपूरपर्यंत काढण्यात येत असलेली युवा संघर्ष यात्रा स्थगित करत असल्याची घोषणा केली. ही यात्रा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर ही यात्रा नागपुरात धडकणार होती. दहा जिल्ह्यांतील 28 तालुके आणि आठशे तीस गावांतून ती जाणार होती. पिंपरी-चिंचवडमधील अडीच हजार युवा त्यात सामील होणार आहेत. चाळीस हजार जणांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आतापर्यंत केली होती. (Maratha Reservartion)

रोहित पवार म्हणाले, युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याबाबत काल रात्रीपासून चर्चा आणि विचार सुरु होता. याबाबत अनेक जिल्ह्यांतील मराठा समाजाला आरक्षणासाठी लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे.वातावरण वेगळ्या दिशेने जाणार नाही. यासाठी युवा संघर्ष यात्रा संघर्ष यात्रा काही काळ स्थगित करत आहे. संतांनी एक धर्म एकत्र येऊन लढावं, अशी शिकवण असल्याचेही ते म्हणाले.

पवार म्हणाले, आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राजकारण करू नका. जाती-जातीत तेढ निर्माण करू नये. इतर विषयांवर बोलणार आहे. गावबंदी आहे म्हणून संघर्ष यात्रा थांबवत नाही. महाराष्ट्र अस्वस्थ आहे, आत्महत्या होत आहे, म्हणून काहीकाळ यात्रा स्थगित करत असल्याचे पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी 24 ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागातून ही पदयात्रा काढण्यात आली. मात्र, 25 ऑक्टोबरपासून अंतरवालीत पुन्हा मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच पक्षांतील आमदार, खासदारांना गाव बंदी करण्यात आली होती.

त्यानंतरही युवा संघर्ष यात्रा सुरूच ठेवण्यात आली होती. तसेच मराठा समाजाच्या संघटनांकडून नेतेमंडळींना गावबंदी केली जात असल्यामुळे आपण यात्रा थांबवत नसल्याचेही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

मराठा आंदोलकांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेला कडाडून विरोध केला होता. शनिवारपर्यंत युवा संघर्ष यात्रा थांबवली नाही, तर आम्हाला थांबवावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT