Maratha Reservation News : मराठा आंदोलनाला माथाडींचा पाठिंबा; सत्ता आली की आंदोलने करणारे घरात बसतात...नरेंद्र पाटील

Mumbai APMC मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने एपीएमसीतील तीन बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
Narendra Patil, Shashikant Shinde
Narendra Patil, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : काही लोक सत्तेत नसताना मराठा आरक्षणासाठी आंदोलने करतात आणि सत्ता आली की आरक्षणाविषयी कोणतीच कार्यवाही न करता कडी लावून घरात बसतात, अशी टीका माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज राष्‍ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर नामोल्लेख न करता केली.

मराठा आरक्षण आंदोलनाला Maratha Reservation पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार Mathadi Kamgar युनियनच्या वतीने एपीएमसीतील तीन बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. या वेळी झालेल्या सभेत नरेंद्र पाटील Narendra Patil बोलत होते. कांदा-बटाटा, मसाला आणि धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

नरेंद्र पाटील म्हणाले, अनेक वर्षांपासून सत्तेत असतानाही काँग्रेसने मराठा समाजाला काहीच दिले नाही. आंदोलने करणाऱ्यांना लाठ्या खाव्या लागल्या. आपण राजकीय पक्षांच्या गुलामगिरीत अडकलो आहोत. सत्तेत नसताना मराठा आरक्षणावर आंदोलन करणारे सत्ता आल्यावर गप्प बसतात. यापूर्वी कधीही मराठा आंदोलनात न दिसणारे राजेश टोपे मनोज जरांगे-पाटील यांच्या एका सभेत दिसल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.

‘सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या तरुणांना आर्थिक बळ देऊन सक्षम करण्याचे काम केले आहे. अनेक वर्षे सत्तेत असणारे आघाडी सरकार हे करू शकले नव्‍हते. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, अशी अण्णासाहेब पाटील यांची मागणी होती.

Narendra Patil, Shashikant Shinde
Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे राजकीय पडसाद; ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच

त्यासाठी त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली होती; मात्र अण्णासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारे काही गद्दार आहेत. आमची भावकी सत्तेवर आली की आरक्षण विसरते, असा निशाणा त्यांनी साधला. ३१ ऑक्टोबरला माथाडी कामगारांची बैठक होणार आहे. यामध्ये कामगारांच्या मागण्यांविषयी निर्णय झाला नाही तर सहा नोव्हेंबरनंतर आंदोलनाविषयी निर्णय घेण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. Maharashtra Political News

या वेळी शशिकांत शिंदे यांच्यावर टीका करताना नरेंद्र पाटील म्हणाले, शिंदे हे अनेक वर्षांपासून आमदार आणि मंत्री आहेत; परंतु अण्णासाहेब यांचे कोणी किती विचार सभागृहात मांडले हे सांगावे, असा जाब पाटील यांनी विचारला.

Edited By : Umesh Bambare

Narendra Patil, Shashikant Shinde
Satara Maratha Morcha News : जरांगेंच्या उपोषणास पाठिंबा; साताऱ्यात बाइक रॅली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com