Pune Hit And Run Case Sarkarnama
पुणे

Pune Hit And Run Case Update : अगरवाल कुटुंबाला पहिला दणका, बालहक्क न्याय मंडळाचा मोठा निर्णय

Vishal Agarwal Breaking News : अशातच आता पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी बालहक्क न्याय मंडळाचा 'हा' मोठा निर्णय दिला आहे.

Deepak Kulkarni

Pune News : पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणाची राज्यासह देशभरात चर्चा सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तर फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात थेट पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी बाल न्याय मंडळाची भूमिका प्रश्न निर्माण करणारी असल्याचं म्हटलं होतं.

अशातच आता पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी बालहक्क न्याय मंडळाचा 'हा' मोठा निर्णय दिला आहे. यात आता अल्पवयीन मुलाला या अगोदर दिलेला जामीन रद्द करण्यात आला असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय दिला आहे. 14 दिवस अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात राहावे लागणार आहे.

अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस Police तपासानंतर ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाकडून ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या आधी पबमध्ये दारु प्राशन केली होती. त्या पबमध्ये त्याने अवघ्या दोन तासांमध्ये 48 हजार रुपये उडवल्याचे देखील समोर आले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या पबचालकाविरोधात देखील पोलिसांनी कारवाई केली आहे.

देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांनी मंगळवारी (ता.21) अल्पवयीन आरोपीला दिलेल्या जामीनाच्या बाल न्याय मंडळाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच पोलिसांची पाठराखण केली. याविषयी फडणवीसांनी पोलिसांची बैठक घेत आतापर्यंत काय घडलं आहे, पुढची कारवाई काय त्यासोबत अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले होते.

याचवेळी फडणवीसांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया केसमध्ये अल्पवयीन आरोपींविरोधात दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला होता. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करताना पोलिस जितक्या वरती जावं लागेल तितक्या वरती जातील असं आश्वासनही दिलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं.

आता या प्रकरणात बाल न्याय मंडळानं अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला आहे. तसेच त्याची 5 जूनपर्यंत बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.

आरोपीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, तीन न्यायाधिशांच्या समोर याची सुनावणी झाली.सरकारी वकीलांनी मांडले की बाहेर रहाणे या मुलासाठी धोकादायक ठरू शकते. कारण कल्याणीनगरमधे झालेल्या अपघातानंतर या मुलाबाबत समाजात रोष असल्याने त्याला इजा पोहचू शकते.त्यामुळे या मुलाला 5 जूनपर्यंत बाल निरिक्षण गृहात ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या मुलावर तो सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे पोलीस तपासात काय समोर येते यावर ठरेल. दोन किंवा तीन महिन्यात जेव्हा पोलीसांचा तपास पूर्ण होईल तेव्हा पोलिस न्यायालयासमोर बाजू मांडतील. त्यानंतर न्यायालय या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल.हा मुलगा बाल निरीक्षणगृहात असताना पोलिस त्याची चौकशी करु शकतील अशी कायद्यात तरतूद नसल्याचेही वकील पाटील हे यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT