Pune Porshe Accident : पुणे अपघातप्रकरण; वडील विशाल अगरवालसह तिघांना पोलिस कोठडी

Public Prosecutor सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करताना ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणतीही ओळखपत्राची तपासणी न करता अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश कसा दिला, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
Porshe Accident, Vishal Agarwal
Porshe Accident, Vishal Agarwalsarkarnama

Pune News : कल्याणी नगर 'हिट अँड रन' केस प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवाल हा कोर्टासमोर हजर झाला असून बाल हक्क न्यायालयापुढे त्याची सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला पुणे न्यायालयापुढे हजर करण्यासाठी आणले असता न्यायालयाने अगरवाल याच्यासह दोघांना 24 तारखेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया केसचा दाखला देत कल्याणीनगर 'हिट अँड रन' केस प्रकरणांमध्ये देखील अल्पवयीन आरोपीला सज्ञान म्हणून ट्रीट करून आडल्ट म्हणून न्यायालयात केस चालवण्याची मागणी सध्या बाल हक्क न्यायालयात सरकारी पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबत न्यायालय दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेत असून साधारणत साडेचारपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी काल विशाल अगरवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगर येथून ताब्यात घेतल्यानंतर आज दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळीस पोलिसांकडून सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करताना ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणतीही ओळखपत्राची तपासणी न करता अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश कसा दिला.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

तसेच विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? असा सवाल उपस्थित करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजीनगरमध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत, असाही प्रश्न सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी मंजूर केली आहे.

Edited By : Umesh Bambare

Porshe Accident, Vishal Agarwal
Pune Porsche Accident News : दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलानं दोन तासात पबमध्ये उडवली 'एवढी' रक्कम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com