BJP Political News
BJP Political News Sarkarnama
पुणे

BJP Political News : भाजपकडून बुट्टे पाटलांना मोठी जबाबदारी, पुणे 'डीपीडीसी'च्या उपसमितीच्या अध्यक्षपदी वर्णी

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे-

Pimpri Chinchwad : पुणे `डीपीडीसी`चे अध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद बुट्टे यांना `डीपीडीसी`च्या उपसमितीचे अध्यक्ष हे महत्वाचे पद देत त्यांच्यावर मोठा विश्वास आणि जबाबदारी टाकली आहे. पण, जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यापूर्वीच पक्षानं त्यांची दुसरी मोठी जबाबदारी दिली असून यामुळे बुट्टे यांचं जिल्ह्यात राजकीय वजन वाढणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी `डीपीडीसी`च्या उपसमिती स्थापन करण्याची व तिचे अध्यक्षपद शरद बुट्टे यांना देण्याची शिफारस डीपीडीसीचे सचिव तथा पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार नुकतीच ही पाच सदस्यीय उपसमिती नुकतीच गठीत करण्यात आली.त्यात डीपीडीसीवर संधी न मिळालेले भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

भाजपने राज्य कार्यकारणी नुकतीच जाहीर केली.त्यानंतर आता ते राज्यातील आपले ७५ जिल्हाध्यक्ष नेमणार आहेत.त्यात यावेळी पुणे जिल्ह्याला एक नाही,तर दोन अध्यक्ष देण्याचा प्रयोग करण्याच्या विचारात ते आहेत. त्यातून उत्तर पुणे जिल्ह्यासाठी (जुन्नर,आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, मावळ) बुट्टे यांचे नाव घेतले जात आहे. २० मे पूर्वी ही निवड केली होणार आहे.पण त्याअगोदरच पुणे जिल्हा नियोजन समितीच्या उपसमितीचे अध्यक्षपद देऊन शरद बुट्टें(Sharad Butte) वर भाजपनं मोठा विश्वास आणि जबाबदारी टाकली आहे.

पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, हवेली भाजपचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, इंदापूरचे तानाजी शिंगाडे, हिंजवडीच्या (ता.मुळशी)भारती विनोदे अशी त्यांची नावे आहेत. तर, खेडचे बुट्टे हे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सर्व भागाला त्यात प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नियुक्तीनंतर बुट्टे काय म्हणाले ?

जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यामध्ये ज्या कामांना निधी उपलब्ध होतो त्यांना वेळेत मान्यता आणि ई-निविदा होऊन ती कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे,अशी प्रतिक्रिया बुट्टे यांनी या नव्या निय़ुक्ती तथा जबाबदारीवर बुट्टे यांनी `सरकारनामा`ला दिली. गेली २० वर्षे जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा अनुभव असल्याने पालकमंत्र्यांनी आपल्यावर टाकलेला हा मोठा विश्वास कृतीतून सार्थ करून दाखवू असे ते म्हणाले.

डीपीडीसीने मंजूर केलेल्या कामांना गती मिळावी यासाठी ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून मोठा निधी जिल्हा परिषदेच्या विविध भागांकडे येऊन ग्रामीण भागामध्ये अतिशय गरजेची विकास कामे होत असतात. ती वेळेत आणि गुणवत्तेने व्हावी हा ही समिती गठीत करण्यामागील हेतू व प्रयत्न आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT