Lalit Patil  Sarkarnama
पुणे

Sasoon Drug Racket : 'ड्रग्ज रॅकेट' प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश; ललित पाटीलच्या भावाला वाराणसीमधून उचललं

Drug Mafia Lalit Patil News : मुंबईसह पुणे पोलिस हे ललित पाटीलसह भूषण पाटीलच्या मागावर होते.

Deepak Kulkarni

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ड्रगमााफिया ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात धडाकेबाज कारवाई करताना थेट नाशिक येथील कारखान्यावर छापेमारी केली होती. त्यात कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ललित पाटीलचा फास पुणे पोलिसांनी आवळला असून, त्याच्या भावाला अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी ड्रगमाफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटीलला (Bhushan Patil) अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचा ड्रग्ज बनवण्याचा कारखाना आहे.

नाशिक रोडवरील शिंदे एमआयडीसीमधील कारखान्यावर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी धडक कारवाई करताना 6 ऑक्टोबरला छापेमारी केली होती. या कारवाईत पोलिसांनी 300 कोटींचे 150 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते.

पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यामुळे पोलिसांनी ड्रगमाफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलच्या कारखान्यावर मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर मुंबईसह पुणे पोलिस हे ललित पाटीलसह भूषण पाटीलच्या मागावर होते.

मु्ंबईतील साकीनाका पोलिसांनंतर आता पुणे पोलिसांनी थेट वाराणसीमधून भूषण पाटीलला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच फरार ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्यात मदत होणार आहे.

ड्रग्जची तस्करी करणारा ललित पाटील(Lalit Patil) ससूनमधून पळून गेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती, पण पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दत्ता डोके असे त्या कारचालकाचे नाव आहे. बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास दत्ता डोके याने मदत केल्याचा आरोप आहे.

येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत होता. ससून रुग्णालयातील कोठडीतून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट(Drugs Racket) चालवत होता. चार दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने हे ड्रग्ज रॅकेट उघड करताना ललित पाटीलच्या दोन साथीदारांना दोन कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह अटक केली होती. मात्र, त्याच्या दुसर्‍याच दिवशी ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT